राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझील मधून शुद्ध गीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना श्री सुनील केदार म्हणाले की. या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्यांच्या सगळे अत्यावश्यक प्रारूप हे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांना उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये वळू खरेदी करताना केंद्र सरकारचे जे काही निकष आहेत जसे की रोगमुक्त असल्याबाबतचा आवश्यक तपासण्या, तसेच डीएनए तपासणी द्वारे वंशावळीची खातरजमा करून खरेदी करण्यात येणार आहेत.
यामधून सरकारचा प्रयत्न असणार आहे की, गीर वळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गिरी प्रजातीचे पैदास द्वारे शेतकऱ्यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
ही प्रक्रिया डिसेंबर 2021 पूर्वी आवश्यक त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून एक कृतिशील आराखडा तयार करून वळूंचे आयात करून प्रक्षेत्रावर करण्यात यावे अशा सूचना श्री सुनील केदार यांनी यावेळी दिल्या सदरील बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये नागपूर येथील मदर डेरी मार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व दूध भुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली.
विदर्भ आणि मराठवाड्यात उदबत्ती प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना श्री. सुनील केदार यांनी दिल्या.
या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे प्रतिनिधी श्री गुप्ता, श्री हातेकर, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त तुंबाड, उपसचिव श्री. गोविल, अप्पर सचिव श्री शेंडे उपस्थित होते.
Published on: 18 June 2021, 11:26 IST