भारतात पशुपालनाचा विकास करण्यासाठी, (For Development Of Animal Husbundary) पशुधन वाढीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. पशुधनाची वृद्धी व्हावी म्हणुन देशातील अनेक संस्था, वैज्ञानिक, पशु चिकित्सक नेहमी प्रयत्नरत असतात आणि नवनवीन शोध लावत असतात. आता भारतात अशीच एक नवीन टेक्निक शास्त्रज्ञानी यशस्वीरित्या पशुसाठी विकसित केली.
जगात ह्याआधी ह्या टेक्निकचा वापर केला गेला आहे पण भारतात ह्या आयवीएफ टेक्निकचा वापर करून पहिल्यांदाच म्हशीचे गर्भाधारण (Pregnancy) करण्यात आले आणि यशस्वीरित्या पारडूचा जन्म देखील झाला. ज्या म्हशीत आयवीएफ टेक्निकणे गर्भधारना करण्यात आली ती म्हैस बन्नी जातीची आहे. या यशासोबतच भारताने OPU-IVF तंत्रज्ञानात (Technology) पुढचा पल्ला गाठला आहे. ज्या म्हशीवर ह्या टेक्निकचा वापर करण्यात आली ती म्हैस गुजरात (Gujarat) मधील एका शेतकऱ्याची आहे. सोमनाथ जिल्ह्यातील (Somnath District) धनेज गावाच्या विनय ह्या शेतकऱ्याची ही म्हैस होती. ही सर्व प्रक्रिया विनयच्या फार्मवर जाऊन करण्यात आली.
कशी साधली ही किमया
वैज्ञानिकांनी विनय एल. ह्या शेतकऱ्याच्या सुशीला ऍग्रो फार्ममधील बन्नी जातीच्या तीन म्हशी गर्भधारणेसाठी निवडल्या आणि त्यांना त्यासाठी तयार करण्यात आले. शास्त्रज्ञांनी म्हशीच्या अंडाशयातून बीज काढण्याच्या यंत्राद्वारे (इंट्राव्हेजिनल कल्चर डिव्हाइस-IVC) 20 अंडी काढली. तीन म्हशींपैकी एका म्हशीतून 20 अंडी आयव्हीसी प्रक्रियेद्वारे (IVC Technology) काढण्यात आली.
डोनर म्हशीकडून (From Donar Buffalo) काढलेल्या 20 अंड्यांपैकी 11 भ्रूण बनवण्यात आले. त्यापैकी नऊ भ्रूणांची स्थापना झाली, ज्यातून तीन आयव्हीएफ गर्भधारणा अस्तित्वात आल्या. दुसऱ्या डोनरकडून पाच अंडी काढण्यात आली, ज्यातून पाच भ्रूण तयार करण्यात आले. पाचपैकी चार भ्रूण रोपण करण्यासाठी निवडले गेले आणि या प्रक्रियेतुन दोन गर्भधारणा झाल्या. तिसऱ्या डोनरकडून चार अंडी काढण्यात आली, दोन भ्रूण विकसित करण्यात आले आणि त्यांची स्थापना करून एक गर्भधारणा करण्यात आली. ह्या प्रक्रियेतून सहा गर्भधारणा करण्यात आल्या आहेत ज्यापैकी एक गर्भधारनेपासून एका पारडू जन्माला आले.
ह्या आयवीएफ टेक्निकणे पशुधन वाढवण्यात यश मिळेल. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा ह्यातून फायदा होईल याशिवाय देशात पशुधन वाढेल. परिणामी पशुपालक शेतकऱ्याचे उत्पादन वाढेल आणि पशुपालक शेतकरी सुखी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
माहिती स्रोत टीव्ही9 भारत वर्ष हिंदी
Published on: 25 October 2021, 03:34 IST