Chandigarh : ग्रामीण भागात शेतकरी बंधू शेतीसोबत शेती पूरक व्यवसायास देखील प्राधान्य देत असतात. प्रामुख्याने ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दुग्धव्यवसाय करायचा असेल तर जातिवंत गाई-म्हशी असणे गरजेचे आहे. जेणेकरून ती भरपूर दूध देईल. अशीच रेश्मा नावाच्या म्हशीची देशभरात चर्चा होत आहे. मागे हरियाना राज्यातील कैथल जिल्ह्यातील बुढा खेडा गावाला 'सुलतान' नामक बैलामुळे देशभरात चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
आता हा सुलतान बैल राहिला नाही. मात्र याचा मालिक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. मालकाची 'रेश्मा' नामक म्हशीमुळे सध्या देशभरात चर्चा होत आहे. मुर्राह जातीच्या रेश्मा नावाच्या म्हशीने अवघ्या एका एका दिवसात जवळजवळ ३३.८ लिटर दूध देऊन नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. म्हणून तिला देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून सध्या ओळखले जात आहे.
या विक्रमामुळे 'राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने' प्रमाणपत्रदेखील दिले आहे. एवढंच नाही तर रेश्मा म्हशीला उच्च जातीच्या पहिल्या क्रमांकाच्या श्रेणीत स्थान दिले गेले आहे. फॅटच्या गुणवत्ताबाबत बोलायचं झालं तर रेश्मा म्हशीच्या दुधात फॅटची गुणवत्ता ही १० पैकी ९.३१ इतकी आहे.रेश्माच्या प्रसिद्धीमुळे तिच्या मालकांना म्हणजेच राजेश आणि नरेश यांना देशभरात ओळखले जाऊ लागले आहे.
Petrol, Diesel Price:पेट्रोल डिझेलबाबत ठाकरे सरकारचा ढोंगीपणा उघड;अजूनही किमती आहे तशाच
मागे एकदा राजेश आणि नरेश यांनी अशीच देश-प्रदेशात चांगलीच प्रसिद्ध मिळवली होती. मात्र त्यावेळी कारण होतं 'सुलतान बैल'. परंतु मागील वर्षी या बैलाचा मृत्यू झाला. त्याची उणीव भरून काढण्यासाठी दुसऱ्या सुलतानासारख्या बैल आणू पण त्याच्यासारखा तो नसेल. शेवटी त्यांनी रेश्मा नावाची म्हैशीचे पालन केले. आता मात्र मूर्राह जातीची ही म्हैस सर्वाधिक दूध देऊन देशवासीयांची लक्ष वेधून घेत आहे.
शेतात ओढत नेऊन बिबट्याने घेतला शेतमजुराचा बळी; शेतकरीराजांनो काळजी घ्या
तिने सर्वाधिक दूध देऊन जो काही विक्रम केला आहे त्याबद्दल तिला प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. जेव्हा रेश्माने पहिल्यांदा वासराला जन्म दिला तेंव्हा तिने १९-२० लिटर दूध दिले होते. दुसऱ्या वेळी मात्र तिने ३० लिटर दूध दिले. आणि आता तिसऱ्या वेळी आई बनलेल्या रेश्मा नावाच्या म्हशीने ३३.८ लिटर दूध देऊन विक्रमच केला आहे. हे कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी अनेक डॉक्टरांच्या पथकाने जवळजवळ सातवेळा रेश्माचे दूध काढून पाहिले.
आणि नंतरच ती देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस म्हणून घोषित करण्यात आली. या म्हशीचे एकट्याने दूध काढणे कठीणचं. त्यामुळे दूध काढण्यासाठी दोन लोकांना तरी कसरत करावीच लागते. डेअरी फार्मिग असोसिएशनच्या वतीने पशु मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात देखील रेश्माने ३१.२१३ लिटर दूध देत प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली होती. याव्यतिरिक्त तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
रोज ५० रुपये जमा करून मिळवा ३५ लाख, पोस्ट ऑफिस योजनेबद्दल जाणून घ्या
Published on: 24 May 2022, 12:51 IST