Animal Husbandry

शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे. कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत चांगल्या आर्थिक उत्पन्नाची निश्चित हमी असणारा हा व्यवसाय आहे.तसेच व्यवसाय मध्ये काही समस्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना होणारे आजार.

Updated on 14 November, 2021 10:14 AM IST

शेळी पालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आला आहे. कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत चांगल्या आर्थिक उत्पन्नाची निश्चित हमी असणारा हा व्यवसाय आहे.तसेच व्यवसाय मध्ये काही समस्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना होणारे आजार.

 सगळ्यांना विविध प्रकारचे आजार होतात त्याचे निराकरण ही करण्यात येते. तसेच काही आजारांच्या बाबतीत लसीकरण करतात. परंतु काही आजार जास्त घातक असतात. या लेखात आपण अशाच एका आजाराविषयी माहिती घेणार आहोत. त्या आजाराचे नाव आहे सांसर्गिक गर्भपात म्हणजेच ब्रुसेलोसिस.

 काय आहे सांसर्गिक गर्भपात( ब्रुसेलोसिस) आजार

 हा आजार प्रामुख्याने ब्रुसेला ओविस या प्रकारच्या जिवाणूमुळे होतो. या आजारांचे संक्रमण जर नरांमध्ये झाले तर नरांना वंध्यत्व  निर्माण होऊ शकते. या आजाराचे सगळ्यात घातक वैशिष्ट्य म्हणजे, हा आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होण्याची शक्‍यता अधिक असते. म्हणून मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे. जगामधील बऱ्याच देशांमध्ये हा आजार आढळतो. हा आजार शेळ्यांमध्ये झाला तर गाभणशेळ्यांच्या साडेतीन महिने ते चार महिन्याच्या काळात गर्भपात होतो.

एखाद्या शेळीला कळपामध्ये आजार झालेला असेल तर त्या शेळीचा पडलेला जार, गर्भ सभोवतालची चिकट पाणी, लघवी, दूध, वीर्य अशा अनेक माध्यमातून हा आजार कळपात पसरतो.त्यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते.

 या आजारापासून वाचण्यासाठी करावयाचे उपाय योजना

 हा आजार वर्षानुवर्ष कळपामध्ये राहतो. या आजाराचा जिवाणू असल्याने तो अनेक मार्गाने एकापासून दुसऱ्या कडे संक्रमित होत असतो. जसे की, कळपामध्ये काम करणारे मजूर या अशा इतर माध्यमांद्वारे हा जिवाणू पसरत असतो. म्हणून यापासून वाचण्यासाठी गोठ्याची स्वच्छता जबाबदारी ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे आपण जेव्हा बाजारातूशेळीविकत आणतो तेव्हा त्या शेळ्यांची खरेदी करताना त्या शेळ्यांचा मागील इतिहास जसे की त्यांना काही आजार वगैरे नाही ना याची खात्री करून घ्यावी.

खरे पाहायला गेले तर या आजारावर  कुठलाही प्रकारचा प्रभावी उपचार नाही. केवळ लक्षणांच्या आधारावर उपचार करावा लागतो. परंतु त्याने आजार पूर्ण बरा होईल याची शाश्वती नसते.

 दरम्यान असलेल्या उपचारांचा खर्च अफाट असतो. या आजारातून जनावर बरे झाले तरी त्यांच्या प्रजनन क्षमतेवर याचा खोलवर परिणाम होत असतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या शेळ्या वारंवार  गाभडतात. अशा शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात. प्रजननासाठी ठेवलेल्या नराची  प्रजनन सुरू करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.या आजाराचे निदान  गर्भपात झालेल्या वेळेस पडलेला गर्भ किंवा पडलेल्या जाराची तुकडे यावरून करता येतो.शेळ्यामधून माणसांमध्ये हा आजार विविध माध्यमातून संक्रमित होऊ शकतो. जसे की, कच्चे मांससेवन करणे, प्राण्यांच्या संपर्कात येणारी माणसे, पशुवैद्यक यांना सहजपणे आजाराची संक्रमण होऊ शकते. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे शेळ्यांचा जार उघड्या हाताने काढणे टाळावे.

पूर्ण संरक्षित साधनांचा वापर करावा. जमिनीचे वर्षाचे जमिनीचे व शेड चे निर्जंतुकीकरण करावे.गाभडलेला गर्भ खोल खड्डा करून पुरून  द्यावा.

 या आजाराची लक्षणे

 या आजाराने संक्रमित झालेल्या शेळीची कास नेहमी सुजलेलीदिसते किंवा वारंवार सुजते. संक्रमित झालेल्या शेळ्या अचानक पणे लंगडू लागतात. आजार झाल्यास शेळ्यांच्या व्ययच्या वेळी जारअडकत असतो. नरामध्ये टेस्टीस  सुजलेल्या दिसतात. तसेच गुडघ्यामध्ये सूज जाणवते. वरीलपैकी काळजी घेऊन शेळी पालकांनी शेळ्यांची काळजी घ्यावी. होणारे आर्थिक नुकसान पासून स्वतःचा बचाव करावा.

English Summary: brusolis disease is dengerous disease in goat keep proper management
Published on: 14 November 2021, 10:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)