Animal Husbandry

शेळी पालन व्यवसाय हा गरीब शेतकरी तसेच मोठी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या साठी कमी खर्चात आणि सामान्य देखभालीत उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत बनत आहे. झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये या शेळ्या त्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या स्वरूपात मदत करतात.

Updated on 21 June, 2022 8:53 PM IST

शेळी पालन व्यवसाय हा गरीब शेतकरी तसेच मोठी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या साठी कमी खर्चात आणि सामान्य देखभालीत उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत बनत आहे. झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये या शेळ्या त्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या स्वरूपात मदत करतात.

पण तरीही योग्य जाती आणि संपूर्ण माहिती नसल्याने शेळ्यांपासून फारसा नफा शेतकरी मिळवू शकत नाहीत. आज आपण अशा शेळीच्या जाती बद्दल बोलू ज्यांची प्रदेशात सर्वाधिक पालन केले जाते.

1) बोअर शेळी:-

 जेव्हा जेव्हा बोअर बकरीचा उल्लेख केला जातो तेव्हा ते वजन वाढवण्यासाठी ओळखले जाते. बोअर शेळी ही परदेशात मोठ्या प्रमाणात पाळली जाणारी जात आहे,

विशेषत: दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये बोअर शेळी मोठ्या कळपात पाळली जाते. बोअर शेळीच्या मांसाची वाढती मागणी पाहता ही शेळी मोठ्या प्रमाणात पाळली जाते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..

 बोअर शेळ्या खास मांसासाठी पाळल्या जातात. बोअर शेळ्यांचे व्यवसायिक प्रजनन देखील खूप यशस्वी आहे, याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना होतो.

बोअर शेळ्यांचे प्रजनन साधारणत: ऑगस्ट ते डिसेंबर या काळात होते. बोअर शेळ्यांमध्ये ही केवळ मध्यम आकाराच्या शेळ्यांनाच प्राधान्य दिले जाते परदेशात या जातीचे वाढती मागणी पाहता येथील शेतकऱ्यांनीही या जाती बाबत उत्सुकता दाखवली आहे.

 भारतातही अलीकडच्या काळात बोअर शेळ्या पाळ णाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. बोअर शेळी मां सासाठी आढळणाऱ्या सर्व शेळ्यापैकी सर्वात मोठी शेळी आहे.जे लोक मांसाचे शौकीन असतात.

त्यांना या बकरीचे मांस खायला आवडते.

नक्की वाचा:Animal Fodder:गाई-म्हशींना हा चारा खाऊ घाला,दूध देतील जास्त प्रमाणात,वाचा या चाऱ्याची वैशिष्ट्ये

 दुसरीकडे बोअर शेळीच्या प्रजनन दराबाबत बोलायचे झाले तर त्यांची प्रजनन क्षमता इतर शेळीपेक्षा जास्त असते, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.

प्रौढ नर  शेळीचे वजन सुमारे 110 ते 155 किलो असते आणि जर आपण त्याच प्रौढ मादी बोअर शेळीचे वजन सुमारे 90 ते 110 किलो असते.

शेळीचे मांस म्हणजेच बोअर शेळ्यांच्या मांसाची चव देखील इतर शेळ्यांच्या मांसा सापेक्षा खूप चांगले असते 2) बोअर शेळीची शारीरिक वैशिष्ट्ये :-

1) बोअर बकरीच्या शारीरिक वैशिष्ट्ये बद्दल बोलायचे तर, त्याचा रंग साधारणपणे शरीरावर पांढरा असतो.आणि मानेचा भाग हलका तपकिरी असतो. त्याचप्रमाणे काही शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या आणि पूर्णपणे तपकिरी दिसतात.

2) बोअर शेळी ला खूप लांब कान असतात.

3) बोअर शेळी सर्वात वेगाने वाढणाऱ्या शेळ्यांमध्ये गणली जाते आणि सर्व जातींच्या शेंळ्यापेक्षा जास्त मांस उत्पादन क्षमता आहे.

4) सर्व जातीच्या शेळ्यांच्या तुलनेत बोअर शेळीला आपल्या पिलांबद्दल अधिक मातृत्वाची भावना असते.

नक्की वाचा:शेळीपालनाची करा सुरुवात अन 'या' बँकांकडून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज, वाचा आणि जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

3) बोअर शेळी पूरक:-

 सामान्य शेळ्याप्रमाणे बोअर शेळ्या सर्व प्रकारच्या झाडांची पाने खातात.त्यांना सहसा झाडांची हिरवी पाने कॉर्न हिरवे गवत खायला आवडते.या जातीच्या शेळ्यांचे वजन खूप लवकर वाढते. त्यामुळे त्याचा डोसही इतर शेळ्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे शेळीपालक किंवा मध्यम आकाराच्या शेळ्या पाळण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांचा चाराही कमी असतो.

नक्की वाचा:दुग्ध व्यवसायात फायद्याच्या आहेत 'या' 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई, वाचा सविस्तर माहिती

English Summary: boar goat species is benificial in goat keeping (1)
Published on: 21 June 2022, 08:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)