सध्या पशुपालकांचा कला छोट्या जनावरांच्या पालना कडे जास्त वळताना दिसत आहे. कारण छोट्या पशूंना पाळण्यासाठी खर्च कमी येतो परंतु नफा जास्त होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर देशात शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जातींच्या पालन मोठ्या प्रमाणात केले जाते.
शेळीपालनामध्ये चांगला नफा कमावता येऊ शकतो.परंतु बऱ्याच वेळी शेळी पालकांना माहीत नसते की कोणत्या जातीची शेळी फायदेशीर ठरेल. या लेखात आपण अशाच उन्नत जातीच्या दोन शेळ्यांची माहिती घेऊ.
शेळ्याच्या महत्त्वाच्या दोन प्रगत जाती
ब्लॅक बंगाल- या जातीच्या शेळ्या झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर ओरिसा आणि बंगाल राज्यात पाळले जातात. या प्रजातीच्या बकऱ्यांचा रंग हा काळा, भुरा व सफेद असतो. या शेळ्यांची उंची लहान असते.नर आणि मादी या दोघांमध्ये पुढे असलेली सरळ शिंगे असतात.शिगांची लांबी तीन ते चार इंचापर्यंत असते.
- या जातीच्या शेळ्यांची शरीर पुढच्या बाजूने मागच्या बाजूपर्यंत जास्त रुंद आणि मधल्या भागात जास्त जाड असते. या शेळीचे कान छोटे आणि मागच्या बाजूने झुकलेली असतात. या जातीच्या नराचे वजन कमीत कमी 18 ते 20 किलोपर्यंत असते तर मादी शेळीचे वजन 15 ते 18 किलोपर्यंत असते. या जातीची शेळी दररोज तीन ते चार महिन्यांपर्यंत तीनशे ते चारशे मिली दूध देते.
- सिरोही शेळी- या जातीची शेळी झारखंड राज्याच्या व्यतिरिक्त राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये पाळली जाते. या जातीच्या शेळी चा आकार छोटा असतो. या शेळी चा रंग भुरा असतो. तसेच शरीरावर हलक्या भुऱ्या रंगाचे डाग असतात. तसेच कान चपटे असून लटकल्या सारखे दिसतात. शिंगे मागच्या बाजूला वळलेले असतात.
सिरोही बकरी चे वजन
- या जातीच्या प्रौढ नराचे वजन 50 किलोपर्यंतअसते. तर मादी शेळीचे वजन चाळीस किलोपर्यंत असते.
- मादी शेळीची लांबी जवळजवळ 62 सेंटीमीटर असते.
सिरोही बकरी चे दूध उत्पादन
या जातीची बकरी दररोज सरासरी प्रति वेद सरासरी 65 किलो दूध देण्याची क्षमता असते.
या दोन्ही प्रजातीच्या बकऱ्या कमीत कमी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत मिळतात.
Published on: 05 January 2022, 05:52 IST