Animal Husbandry

दुष्काळी भागात आणि कमी पावसाचे ठिकाणी गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण कमी पाऊस झाला तर जनावरांना उन्हाळ्यात कायखाऊ घालावे ही समस्या पशु पालकांसमोर निर्माण होत असते.

Updated on 03 February, 2022 6:25 PM IST

दुष्काळी भागात आणि कमी पावसाचे ठिकाणी गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण कमी पाऊस झाला तर जनावरांना उन्हाळ्यात कायखाऊ घालावे ही समस्या पशु पालकांसमोर निर्माण होत असते.

कारण दुधाचे उत्पादन कमी होत असते. दरम्यान आता अशा परिसरातील पशु पालकांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण दरम्यान राजस्थान मधील जोधपूर येथे स्थित असलेल्या केंद्रीयशुष्कक्षेत्र संशोधन संस्थेने एक नवेचारापिक  विकसित केले असल्याचेवृत्तगाव कनेक्शन या वृत्त संस्थेने दिले आहे.

दरम्यान अनेक राज्यातील शेतकऱ्यांना या पिकांविषयी माहिती या संस्थांकडून दिले जात आहे. राजस्थानसह इतर राज्यातील क्षेत्रात ही या पिकाचे उत्पादन चांगलेआले आहे. सेंट्रल शुष्क विभाग संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश तंवर यांच्यामते, चाराबीट दुसऱ्या चार पिकांच्या तुलनेत कमी जागेत आणि कमी वेळात देखील उत्पादित होते. दरम्यान चाराबीटआकार हा दुसरा बीटसारखाचा दिसतो, पण याचा आकार मोठा असतो.

त्याचे वजन हे पाच ते सहा किलो असते.ब्रिटेन,फ्रान्स,हॉलंड न्यूझीलंड या देशातील पशुपालकांनी मध्ये हे पीक खुप लोकप्रिय आहे.भारतातील पशुसाठी चारा बीटकिती उपयोगी आहे, यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि अनेक प्रदेशातील कृषी विभाग एकत्र येत काम सुरू केले आहे.चारा बिटाची लागवड ही 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबरच्यादरम्यान केली जाते.

 चार महिन्यात प्रति हेक्टर 200 टनापर्यंत याचे उत्पादन होते. खाऱ्या जमिनीत याचे उत्पादन चांगले येते.चारा बीटयासाठी लागणारा हा खर्च हा एक रुपयांपेक्षा कमी असल्याचे कंवर यांनी माध्यमांना सांगितले आहे.चारा बीट हे दुसरा चाऱ्यात मिसळून गुरांना खाऊ घातले पाहिजे.पिकांचे खोड हे छोटे-छोटेतुकडे करून कोरडाचाऱ्यातमिसळावे. गाई आणि म्हैशीसाठीप्रत्येक दिवशी 12ते 20 किलो चा खुराक द्यावा.

तर छोट्या पशुना 4 ते 6 किलोचा खुराक द्यावा. दरम्यान चार दिवसांपूर्वी कापण्यात आलेला चारा जनावरांना देऊ नये. गाईंना चारा बीट खाऊ घातल्यानंतर गाईच्या दुधाच्या उत्पादनात दहा टक्के वाढ झाल्याचे कंवर म्हणाले. एका एकर साठी दोन ते अडीच किलो बियाणे लागते.जोमोन, मोनरो,जेके कुबेर आणि जेरोनिमो हे चारा बीटचेचांगले वाण आहेत. मध्य प्रदेश,हरियाणा, छत्तीसगड,उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात ही या पिकाचे चांगले उत्पादन आले आहे.

English Summary: bit is a crucial fodder for cow and buffalo that help to growth of milk production
Published on: 03 February 2022, 06:25 IST