Animal Husbandry

म्हैस पालन आणि डेअरी उद्योग त्यांचा खूप निकटचा संबंध आहे. आपल्या देशात जवळजवळ पंचावन्न टक्के दूध म्हणजेच 20 मिलियन टन दूध म्हशीच्या माध्यमातून मिळते. जर तुम्हाला दूध व्यवसायात यायचे असेल आणि म्हशी पाळायच्या असतील तर जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जातीच्या म्हशी पाळणे फायद्याचे असते.म्हशीच्या अशा काही जाती आहेत ज्यांची क्षमता जास्त दूध देण्याचीआहे. या लेखात आपण अशाच काही म्हशीच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 29 September, 2021 3:22 PM IST

 म्हैस पालन आणि डेअरी उद्योग त्यांचा खूप निकटचा संबंध आहे. आपल्या देशात जवळजवळ पंचावन्न टक्के दूध म्हणजेच 20 मिलियन टन दूध म्हशीच्या माध्यमातून मिळते. जर तुम्हाला दूध व्यवसायात यायचे असेल आणि म्हशी पाळायच्या असतील तर जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जातीच्या म्हशी पाळणे फायद्याचे असते.म्हशीच्या अशा काही जाती आहेत ज्यांची क्षमता जास्त दूध देण्याचीआहे. या लेखात आपण अशाच काही म्हशीच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत.

दूध उत्पादनासाठी म्हशीच्या ही उपयुक्त जाती

  • जाफराबादी म्हैस-

जाफराबादी जात ही सगळ्यात जास्त महत्त्वाचे जात आहे. या जातीची म्हैस गुजरातमधील गीर जंगलाच्या परिसरात जास्त आढळते. या म्हशीचे डोके आणि तिचे मान याद्वारे तिची वेगळी ओळख आहे.कारण या म्हशीचे डोके रुंद असते.या म्हशीच्या दुधाचा विचार केला तर सरासरी दूध उत्पादन एका वेतात 1000 ते 1200 लिटर आहे.

  • मुऱ्हा म्हैस–

मुरा म्हैस सगळ्यात जास्त दूध देणारी जात मानली जाते. या जातीच्या म्हशी ची मागणी हरियाणा राज्यात जास्त आहे.हरियाणा आणि पंजाब राज्यांची शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या म्हशीची खरेदी केली जाते. दररोज 15 ते 20 लिटर दूध देते. या जातीच्या म्हशी ची फॅटप्रमाण 7 टक्क्या पेक्षा अधिक आहे.

  • सुरती म्हैस-

ही जात गुजरात राज्यातील आहे. जी गुजरात राज्यातील बडोदा परिसरात जास्त आढळते. जाफराबादी म्हशी प्रमाणे या जातीच्या म्हशीचा रंग गर्द काळा असतो. या जातीची म्हैस दिसायला कमजोर दिसते परंतु या म्हशीचे डोके लांब असते.दूध उत्पादनाच्या बाबतीत प्रति वेत 900 ते 1300 लिटर दुध देते.

  • महेसानाम्हैस-

या जातीची म्हैस देखील गुजरात राज्यातील मैसाना जिल्ह्यात पाळली  जाते. हि म्हैस दिसायला मुरा जातीच्या म्हशी सारखीच दिसते. या जातीच्या म्हशी चा रंग काळा थोडासा भुरकट असतो हि म्हैस  दिसायला फारच धडधाकट दिसते. दूध उत्पादनाचा विचार केला तरी चे सरासरी दूध उत्पादन प्रति वेत 1200 ते 1500 लिटर आहे.

 

  • भदावरी म्हैस–

म्हशीची ही जात उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा, इटावा आली मध्य प्रदेश राज्यातील  ग्वाल्हेर या परिसरात जास्त आढळते. या जातीच्या म्हशीचे डोके छोट्या आकाराचे असते तसेच पाय देखील छोटी छोटी असतात. जर दूध उत्पादनाचा विचार केला तर प्रतिभेत सरासरी 1250 ते 1350 लिटर दूध देते.

 जर तुम्हाला म्हैस पालन करायचे असेल तर तुम्ही फायदेशीर जातींची निवड करू शकता. या जाती डेरी उद्योगासाठी फारच फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. या जातींपासून चांगल्या प्रकारचे दूध उत्पादन मिळेल आणि आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

English Summary: benificial species of buffalo benifit to farmer
Published on: 29 September 2021, 03:22 IST