कृषीपूरक व्यवसाय मध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांना सोयीस्करआणि तुलनेने सोपा व्यवसाय ठरू शकतो. यामध्ये पारंपरिक पद्धतीने देशी कोंबड्या पाळल्या जातात.कोंबड्यांची अंडी व माउस उत्पादन अत्यंत कमी असल्याने त्यांच्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे नवीन विकसित जातीचा परसबागेतील कुक्कुटपालनासाठी अवलंब केल्यास त्यांच्यापासून आर्थिक फायदा चांगला होऊ शकतो..
कुटुंबाच्या पोषक आहाराच्या विशेषता प्रथिनांची गरज घरगुती पातळीवर पूर्ण करणे शक्य होते. तसेच परसबागेतील कुक्कुटपालन हा व्यवसाय भूमीहीन शेतमजूर महिलांसाठी चांगला रोजगार देऊ शकतो. परसबागेतील कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला नेमके कशाचे उत्पादन घ्यायचे आहे याचा अवश्य विचार करावा.त्यानुसार पक्ष्यांच्या जातींची निवड करणे गरजेचे आहे.या लेखात आपण परसबागेतील कुकुट पालना साठी उपयुक्त जातींचा अभ्यास करणार आहोत.
परसबागेतील कुक्कुटपालनासाठी उपयुक्त कोंबड्याच्या जाती
वनराज
- ही जात अंडी व मांस उत्पादनात उपयुक्त आहे.
- रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे.
- मुक्त संगोपन पद्धतीत जुळवून घेण्यास सक्षम आहे.
- योग्य आहार व्यवस्थापन केल्यास नर कोंबड्याचे आठ ते दहा आठवड्यात एक ते सव्वा किलो वजन मिळते.
- एका वर्षांमध्ये अंडी उत्पादन 160 ते 180 अंडी मिळते.
गिरीराज
- ही जात मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहे.
- वीस ते बावीस आठवड्यात अंडी उत्पादनास सुरुवात करते.
- या जातीची कोंबडी प्रतिवर्षी 170 ते 180 अंडी देते.
- पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन तीन ते साडेतीन किलो असते तर मादी पक्षाचे वजन अडीच ते तीन किलो मिळते.
सुवर्णधरा
- कोंबडीची ही जातअंडी,पाऊस आणि मिश्र संगोपन करण्यास उपयुक्त आहे.
- 22 ते 23 आठवड्यात या जातीची मादी तीन किलो वजनाची होते.तर नर अंदाजे साडेतीन किलो वजनाचा होतो.
- अंडी उत्पादन एका वर्षात अंदाजे 190 ते दोनशे अंडी देते
Published on: 07 December 2021, 01:55 IST