Animal Husbandry

दुधाळ जनावरे व पौष्टिक चारा एक एकमेकांचे सुसंगत असे समीकरण आहे. जनावरांना जर पौष्टिक चारा खायला दिला तर त्यांच्या आरोग्य चांगले राहते परिणामी दुग्धोत्पादनात वाढ होते. या लेखामध्ये आपण बाजरीचा हिरवा चारा आणि वाळलेला चारा त्याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच दशरथ, नेपियर चाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 23 July, 2021 6:10 PM IST

 दुधाळ जनावरे व पौष्टिक चारा एक एकमेकांचे सुसंगत असे समीकरण आहे. जनावरांना जर पौष्टिक चारा खायला दिला तर त्यांच्या आरोग्य चांगले राहते परिणामी दुग्धोत्पादनात वाढ होते. या लेखामध्ये आपण बाजरीचा हिरवा चारा  आणि वाळलेला चारा त्याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच दशरथ, नेपियर चाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • दशरथ चारा:
  • हे एक ते दोन मीटरपर्यंत उंच वाढणारे द्विदल वर्गातील बहुवर्षीय झुडूप असून त्याच्या खोडाचा जमिनीलगतचा भाग काहीसा काष्ठमय असतो.
  • याची चराऊ रानात लागवड केल्यास वर्षभर हिरवा चारा मिळू शकतो. यामध्ये 19.1 टक्के प्रथिने,9.6 टक्के फॅट,1.9 टक्के खनिजे,37.7टक्के कर्बोदके असतात. तसेच कॅल्शियम, फास्फोरस, पोटॅशियम, सोडियम व मॅग्नेशिअम पुरेशा प्रमाणात असतात.
  • रोगमुक्त, भेसळमुक्त आणि न फुटलेल्या बियाण्याची निवड करावी. बागायती क्षेत्रात लागवड करताना दोन ओळींतील अंतर 40 ते 45 सेंटिमीटर ठेवून बियाणे सलग पेरावे. हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे लागते.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणे पाच मिलि रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • लागवडीच्या वेळी 25 किलो नत्र, 40 किलो स्फुरदआणि 20 किलो पालाश द्यावे.
  • लागवड जून ते ऑक्टोबर या कालावधीत करावी.
  • वर्षाअखेर साधारणतः पाच ते सहा कापण्या मिळतात. पहिली कापणी पेरणीपासून 60 दिवसांनी करावी. त्यानंतर दर 45 ते 50 दिवसांनंतर कापण्या कराव्यात. अशाप्रकारे कापणी केल्यास फांद्या पालेदार, रसाळ असतात. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात.
  • दरवर्षी हेक्‍टरी 60 ते 80 टन हिरवा चारा उपलब्ध होतो.

 

  • बाजरी:
  • हे एकदल वर्गातील चारा पीक आहे. याचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो.
  • लागवड जून महिन्यामध्ये करावी. दोन ओळीतील अंतर पंचवीस ते तीस सेंटिमीटर ठेवावे.
  • हेक्‍टरी 12 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच मिलि ऐझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • हेक्‍टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी.
  • पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी.कापणी करताना चार ते पाच इंच जमिनीपासून वर कापावे. यामुळे फुटवे जास्त मिळतात. त्यानंतरची कापणीत 45 ते 50 दिवसांनी करावी.

 

 

  • बायफ संकरित नेपियर -10:
  • हत्ती गवत आणि बायफ बाजरी एक यांचा संकर. हत्ती गवतातील बहुवर्षायूपणा, जास्त उत्पादन, जलद वाढ आणि बाजरीचा पालेदार पणा, मऊ व कुस विरहित पाने, रसाळ हे गुणधर्म एकत्रित आले आहे.
  • चाऱ्यात आठ ते नऊ टक्के प्रथिने, 60 ते 65 टक्के पचनिय घटक असतात. एकदा लागवड केल्यास हे पीक पाच वर्षापर्यंत उत्पादन देते.
  • या चार यामुळे गाई व म्हशींच्या दुधामध्ये वाढ दिसून आली आहे.
  • एक वर्षानंतर गवताच्या एका खोडामध्ये सुमारे दीडशे ते दोनशे फूटवे मिळतात.या गवतापासून वर्षभरात सहा ते सात कापण्या मिळतात. त्यापासून हेक्‍टरी 180 ते 200 टन हिरवा चारा मिळतो.

 

साभार- ॲग्रोवन

English Summary: benificial grass dashrath and bajra for animal
Published on: 23 July 2021, 06:10 IST