शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच दुधव्यवसायासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून योजना राबवली गेली आहे. राज्यातून सुमारे ७ लाख ९८ हजार अर्ज अर्ज यासाठी विभागाकडे दाखल झाले आहेत. जे की १८ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. आतापर्यंत झालेल्या या अर्जामध्ये पहिल्या टप्यात १७ हजार २४२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेसाठी १०२ कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत. एवढा मोठा निधी पहिल्यांदाच योजना सुरू झाल्यापासून मिळाला आहे जे की शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे.
पशूसंवर्धन विभागाकडे जमा झालेले अर्ज :-
शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय करण्यासाठी आता शेतकऱ्याना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून एक योजना राबिवली गेली आहे जे कि १८ डिसेंम्बर पर्यंत ७ लाख ९८ हजार अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात जास्त अर्ज हे शेळीपालन अनुदानासाठी आले आहेत. शेळीपालन अनुदानासाठी सुमारे २ लाख ६४ हजार ५५ अर्ज तर गाई-म्हशी घेण्यासाठी २ लाख २० हजार ८० अर्ज आणि मांसल कुक्कुटपालनासाठी ८१ हजार ७७५ अर्ज केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत त्याचप्रमाणे निधी ही मोठ्या प्रमाणात भेटला आहे.
असा आहे जिल्ह्यांचा समावेश :-
दुधाळ गाई म्हैशीच्या योजनेमध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच सातारा या ४ जिल्ह्यांचा समावेश नसून या योजनेमध्ये तर लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, जालना, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर शेळीपालन करण्यासाठी या योजनेमध्ये बीड, वाशिम, जालना, यवतमाळ, बुलडाणा, नगर, अमरावती , हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून येथून सर्वात जास्त अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जामधून लाभार्थी वर्गाची निवड करण्यात आलेली आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :-
अर्ज करण्यासाठी आपल्या जवळ स्वतःचा फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड नंबर तसेच सातबारा, 8 अ अपत्य दाखला, अनुसूचित जाती जमाती या जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रत, रहिवासी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी सर्व कागदपत्रे आपणास अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
Published on: 18 February 2022, 08:25 IST