मेंढीपालनाचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. अल्पभूधारक किंवा भूमीहीन शेत मजूर शेळी पालन आणि मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. राज्यातील धनगर समाज हा मेंढीपालनावर अवलंबून असतो. पण मेंढीपालनात शेळीपालनापेक्षा अधिक पैसा आहे. मेंढीपासून आपल्याला लोकर, दूध, मांस मिळते त्यातून आपल्याला मुबलक उत्त्पन्न मिळते. मेंढींमध्ये अनेक अशा जाती आहेत ज्या आपल्याला अधिक लोकर आणि दूध देत असतात. दरम्यान केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने (Central Sheep and Wool Research Institute)
नवीन प्रजातीचा शोध लावला असून या जातीच्या मेंढ्या या वर्षाकाठी २ पिल्लांना जन्म देतात. या जातीच्या मेंढ्यांना अविशान मेंढी म्हटलं जात. दरम्यान जाणकारांच्या मते, या जातीच्या मेंढ्या पशुपालकांसाठी खूप फायदेशीर ठरतील. या जातीच्या मेंढ्या एका वर्षात २ पेक्षा अधिक पिल्लांना जन्म देतात. यासह या मेंढ्या मांससाठी खूप उपयोगी आहेत. दरम्यान भारतीय जातीच्या मेंढ्या ह्या एका वर्षात एका पिल्ला जन्म देत असतात. परंतु अविशान जातीच्या मेंढ्या ह्या वर्षाकाठी दोन पेक्षा अधिक पिल्लांना जन्म देतात. यामुळे मेंढीपाळ या जातीच्या मेंढ्या पाळण्यास उत्सुक असून अविशान जातीच्या मेंढ्यां आपल्या कळपात समावून घेण्यास आग्रही आहेत. दरम्यान अनेक राज्यातील पशुपालक आणि मेंढीपाळ अविशान मेंढीपाळत आहेत. राजस्थानमधील स्थानिक जातीची मेंढी मालपुरा, पश्चिम बंगालची गैरोल आणि गुजरातची पाटनवाडीच्या संकरितने अविशान मेंढीची जात विकसीत करण्यात आली आहे. अविशान मेंढी. महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थानसह सर्व राज्यांमधील वातावरणात राहू शकते. दरम्यान जे शेतकरी किंवा पशुपालक उष्ण किंवा अर्ध उष्ण वातावरणात राहत असतील ते देखील या मेंढीचे पालन व्यवस्थित करु शकतील.
देशातील अनेक कुटुंबे ही पशुपालन आणि शेळी- मेंढीपालनाचा व्यवसाय करत आहेत. भारतात पाळण्यात येणाऱ्या मेंढ्याकडून वर्षाकाठी १ किलोग्रॅम लोकर उत्पादित होत असते. तर मांस हे २५ ते ३० किलो मिळत असते. यासाठी मेंढींच्या ताजीत सुधारणा केली जात आहे. जेणेकरून लोकर,मांस , दुधातून अधिक उत्पन्न मिळावे. दरम्यान ज्या पशुपालाकांना आणि मेंढपालनांना अविशान जातीची मेंढी हवी असेल तर संस्थेच्या संचालकांना अर्ज लिहून पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकतात. ज्यावेळी मेंढी उपलब्ध असतील त्यावेळी पशुपालकांना संस्थेतून फोन केला जाईल.
Published on: 01 September 2020, 01:29 IST