Animal Husbandry

गेल्या काही वर्षापासून देशातील बळीराजा पारंपरिक शेती सोबत आधुनिक शेती करण्यावर भर देत असून शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. आधी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा. आता मात्र पशु व्यवसायासह मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय करत आहेत. या लेखात आपण मधुमक्षिका पालन या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत

Updated on 05 December, 2021 12:51 PM IST

गेल्या काही वर्षापासून देशातील बळीराजा पारंपरिक शेती सोबत आधुनिक शेती करण्यावर भर देत असून शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. आधी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा. आता मात्र पशु व्यवसायासह मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय करत आहेत. या लेखात आपण मधुमक्षिका पालन या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत

 मधुमक्षिका पालन एक फायदेशीर व्यवसाय

 आपल्या भारतात मधमाशांच्या चार प्रजाती आहेत. यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे मधमाशी कोणती घ्यायची याची माहिती जाणकारांकडून घ्यावी. या चार प्रजातींपैकी दगडी माशी अपीस डोरसाटाया माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहती मागे सरासरी मध उत्पादन 50 ते 80 किलोपर्यंत असते. लहान माशी अपीस फ्लोरिया या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहती मागे अंदाजे 200 ते 900 ग्रॅम मध मिळते. भारतीय मधमाशी अपीससेराणाइंडिका या मधमाशा द्वारे होणाऱ्या मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत सहा ते आठ किलो असते. अशा वेगळ्या प्रकारच्या मधमाशा आपल्या भारतात आहेत.

 मधमाशा साठी लागणाऱ्या पेट्या

 मधुमक्षिका पालनासाठी पेट्याची  आवश्यकता असते.एका पेटी ची किंमत सुमारे 3500 असते. एका पेटीत एकूण दहा प्रेम असतात. एका फ्रेम मध्ये 250 ते 300 माशा राहतात.माशीची निवड केल्यानंतर पेटा योग्य ठिकाणी ठेवावेत. कालांतराने माशा मधपेटीत साठवण्यास सुरुवात करतील. मधाचे पोळे मधाने भरल्यानंतर ते योग्य पद्धतीने चाकूने कापून घ्यावे. त्यानंतर कापून घेतलेला भाग यंत्र टाकावा. यंत्र सुरू झाल्यानंतर मध बाजूला होऊन नको असलेला भाग वेगळा होतो.

 एका फ्रेम मधून साधारण 200 ग्रॅम एवढे मध मिळते. म्हणजे एका पेटीतून दोन किलो मध आपल्याला प्राप्त होत असते. एका पेटीतून आपण महिन्याला चार किलो मध काढू शकतो. हे मत आपण जनरल स्टोअर्स आणि किराणा स्टोअर मध्ये विकू शकता. तसेच मध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संलग्न राहून आपण त्यांनाहीमधविकू शकतो. याला सरासरी 100 रुपये किलो इतका भाव मिळतो. अशाप्रकारे आपण एका महिन्याला एक लाख 15 हजार रुपये किमतीचे मध विकू शकतो.

 मध शेती करताना घ्यावयाची काळजी

मधुमक्षिका पालन व्यवसाय करताना पेटी या खुल्या जागेत ठेवाव्यात. त्यामुळे माशांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते. तसेच मधमाशांना त्रास दिल्यास त्या चावा घेतात  त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

दरम्यान मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण जर घ्यायचे असेल तर भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये घेऊ शकतात.

 मधाच्या पोळ्यांची स्थापना कुठे कराल?

 पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध्ये उत्पादन केंद्र उभारावे. फळबागांच्या जवळ मकरंद,परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्याचे तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मधमाशी पेटी ठेवताना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी ठेवावी.जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाहीत. वसाहतींना पाळीव जनावरे, अन्य प्राणी,गर्दीचे रस्ते,इलेक्ट्रिक पोल यापासून दूर ठेवावे.

English Summary: bee keeping is benificial bussiness oppourtunity to farmer
Published on: 05 December 2021, 12:51 IST