Animal Husbandry

यापासून देशातील बळीराजा पारंपरिक शेती सोबत आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असून शेतीमध्ये विविध प्रयोग करीत आहे. आधी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा. मात्र आता पशुपालन व्यतिरिक्त मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन सारखे व्यवसाय करीत आहे. या लेखात आपण मधुमक्षिका पालन विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

Updated on 03 October, 2021 11:10 AM IST

यापासून देशातील बळीराजा पारंपरिक शेती सोबत आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असून शेतीमध्ये विविध प्रयोग करीत आहे. आधी शेतीसह जोड व्यवसाय म्हणून शेतकरी फक्त पशुपालनाचा व्यवसाय करत असायचा. मात्र आता पशुपालन व्यतिरिक्त मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन सारखे व्यवसाय करीत आहे. या लेखात आपण मधुमक्षिका पालन विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

 मधुमक्षिका पालन एक उत्तम व्यावसायिक संधी

 मधुमक्षिका पालन यामधून एक दुय्यम उत्पादन मिळते ज्याची बाजारपेठेत खूप मागणी आहे. हे उत्पादन म्हणजे मेन,ज्यापासून  मेणबत्ती तयार करतात. मधुमक्षिका पालन व्यवसाय एक आहे पण त्याचे फायदे अनेक आहेत. नवोदित व्यावसायिकांना ही एक सुवर्णसंधी आहे. कमी गुंतवणूक करून व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात. आपल्याला मदत शेती करायची असेल तर आपल्याला मोठ्या व मोकळ्या जागेची गरज असते. जर तुम्हाला दोनशे ते अडीचशे पेट्या ठेवायचे असतील तर साधारणतः चार हजार पाचशे स्क्वेअर फूट जागेची गरज लागते. आपण आपल्या शेतात देखील जागेवर या मधपेट्या ठेवू शकता.

 मधुमक्षिका पालन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मधमाशी कोणती घ्यायची याची माहिती जाणकारांकडून घ्यावी.भारतामध्ये मधमाश्यांच्या चार प्रजाती आहेत. त्यापैकी दगडी माशी अपीस डोर साटा तमाशा उत्तम प्रकारे मदत गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन 50 ते 80 किलो असते. भारतीय मधमाशी अपिस सेरणा इंडिका या मधमाशा द्वारे होणारे मध्ये उत्पादन दरवर्षी प्रति वसाहत सहा ते आठ किलो असते.

मधमाशा साठी पेटी ची आवश्यकता व महत्व

 मधुमक्षिका पालनासाठी मधमाशी बरोबर पेटीची आवश्यकता असते. एका पेटी ची किंमत ही सुमारे 3500 असते. एका पेटीत एकूण दहा फ्रेम असतात. तर एका प्रेम मध्ये 250 ते 300 माशा राहतात.माशीची  निवड केल्यानंतर पेट्या योग्य ठिकाणी ठेवावेत. कालांतराने माशां मध पेटीत साठवण्यास सुरुवात करतील. मधाचे पोळे मधाने भरल्यानंतर ते योग्य पद्धतीने चाकूने कापून घ्यावे. त्यानंतर कापून घेतलेला भाग यंत्रात टाकावा. यंत्र सुरू झाल्यावर मध बाजूला होऊन  नको असलेला भाग वेगळा होतो. एका फ्रेम मधून साधारणतः दोनशे ग्रॅम एवढा मधून मिळते. म्हणजे एका पेटीतून दोन किलो मध आपल्याला प्राप्त होते. एका पेटीतून आपण महिन्याला चार किलो देखील मत काढू शकतो. हे मग आपणाला जनरल स्टोअर्स आणि किराणा स्टोअर मध्ये विकता येते तसेच मध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संलग्न राहून आपण त्यांनाही मध विकू  शकतो. याला सरासरी 100 रुपये प्रति किलो भाव मिळतो. अशाप्रकारे आपण महिन्याला एक लाख 15 हजार रुपये किमतीचे मदृ शकतो.

मधुमक्षिका पालन  करताना घ्यावयाची काळजी

मध शेती करताना पेटा या खुल्या जागेत ठेवाव्यात.त्यामुळे माशांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते तसेच मधमाशांना त्रास दिल्यास त्याचा होता त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. दरम्यान मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण जर घ्यायचे असेल तर भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकता तसेच https://nbb.gov.inया संकेतस्थळावरील माहिती पाहू शकता.

 मधाच्या पोळ्यांची स्थापना कुठे कराल?

 पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे. फळबागांच्या जवळ मकरंद, परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी. पोळ्याचे तापमान आवश्यक तितकं राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मधमाशा पेटीत ठेवताना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी  ठेवावी.

जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाही. वसाहतींना पाळीव जनावरे, वन्य प्राणी, गर्दीचे रस्ते तसेच इलेक्ट्रिक पोल पासून दूर ठेवावे.

 किती उत्पन्न मिळेल?

 तुम्ही किमान दहा पेट्या घेऊन मधुमक्षिकापालन आला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्स मधून 40 किलो मध मिळाले तर दहा बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रति किलो 350 रुपये दराने चारशे किलो मध विक्री केल्यास एक लाख 40 हजार रुपये कमाई होते.प्रत्येक बॉक्स चा खर्च 3500 रुपये येतो. दहा बॉस ला 35000  रुपये लागतात. म्हणजे यातून तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये फायदा होतो.

English Summary: bee keeping is benificial bussiness in agriculture sector
Published on: 03 October 2021, 11:10 IST