Animal Husbandry

शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बहुतेक शेतकरी पशुपालना कडे वळले आहेत. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्पन्न मिळते.परंतु पशुपालना मध्ये दुधाळ जनावरांचे संगोपन आणि व्यवस्थापन फार योग्य रीतीने करणे आवश्यक असते.

Updated on 05 January, 2022 5:48 PM IST

 शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बहुतेक शेतकरी पशुपालना कडे वळले आहेत. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्पन्न मिळते.परंतु पशुपालना मध्ये दुधाळ जनावरांचे संगोपन आणि व्यवस्थापन फार योग्य रीतीने करणे आवश्यक असते.

विशेषतः उन्हाळ्यामध्ये जर आपण आहार व्यवस्थापन, गोठ्याचे व्यवस्थापन योग्य रितीने व योग्य प्रमाणात केली नाही तर जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊन नुकसान होऊ शकते.

 जास्त उष्णतेचा जनावरांवर होणारा परिणाम

  • जनावरे बहुतांशी त्यांच्याकडे असलेल्या ऊर्जावापर दुग्धोत्पादनासाठी, गर्भाच्या वाढीसाठी आणि शरीर क्रियेसाठी करतात. अशा वेळी जर वातावरणाचे तापमान वाढले तर जनावरांमध्ये ताण येतो.
  • दूध उत्पादन, पोषण आणि प्रजननावर परिणाम होतो.
  • दूध उत्पादनात लक्षणीय रीत्या घट येते.

 वासरांच्या व कालवडीचे वाढीवर परिणाम दिसून येतो.

  • दुधातील फॅट व प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
  • जनावरे उष्माघाताला बळी पडू शकतात.

यासाठी करायच्या उपाययोजना

अ)- आहार व्यवस्थापन

1- जनावरांच्या आहारामध्ये जास्तीत जास्तहिरव्या चाऱ्याचा समावेश करावा. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात मुरघास उपलब्ध होईल असे व्यवस्थापन करावे.

उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्तीत जास्त प्रमाणात थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.

2- जनावरांना प्यायला दिल्या जाणाऱ्या पाण्यामधून इलेक्ट्रॉल पावडर, ग्लुकोज पावडर किंवा गुळ मिक्स केलेले पाणी प्यायला द्यावे. जनावरांना पाणी देण्याच्या वेळा वाढवाव्यात.

3- दुपारच्या वेळी भर उन्हात  जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.

4- जनावरांना सुखाचाराशक्यतो सकाळी व संध्याकाळी  द्यावा. भरदुपारी ने हिरवा चारा द्यावा.

English Summary: bad effect on milk production due to high tempreture and management
Published on: 05 January 2022, 05:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)