Animal Husbandry

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय केले जातात.यामधील पशुपालन हा व्यपवसाय खास करून दुग्धोत्पादनासाठी केला जातो.दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाचांगल्यापैकी नफा मिळूनआर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

Updated on 28 October, 2021 2:11 PM IST

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, कुकुट पालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय केले जातात.यामधील पशुपालन हा व्‍यवसाय खास करून दुग्धोत्पादनासाठी केला जातो.दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाचांगल्यापैकी नफा मिळूनआर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

परंतु पशुपालना मध्येदूध देणाऱ्या प्राण्यांचा आहारहा कशा पद्धतीचा आहे.यावर दूध उत्पादनाचे सगळे समीकरण अवलंबून असते.साहजिकच दूध देणाऱ्या पशूंना संतुलित आहार असेल तर त्यांच्या दूध यांच्या क्षमतेत निश्चितच वाढ होते.आपण पशु साठी चारा, बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारचे पशुखाद्य,मुरघास इत्यादींचा उपयोग करतो. परंतु यासोबतच ऍझोलाहे खाद्य दूध उत्पादनासाठी फारच उपयुक्त आहे. या लेखामध्ये आपण या ऍझोला खादयाविषयी माहिती घेऊ.

 अझोला नेमके काय आहे?

  • ही एक वनस्पती आहे.
  • ही वनस्पती जनावरांना खायला दिल्यास ही उच्च प्रथिनयुक्त असते तसेच पचण्यास सुलभ असते.
  • अझोला हे कोणत्याही प्रकारच्या घन आहारात मिसळून किंवा नुसते जनावरांना खायला देता येते.
  • अझोला उत्पादन हे कमी खर्चात घेता येते तसेच हा शेतीला जोडधंदा म्हणूनहीकरता येतो.
  • दूध देणाऱ्या जनावरांना जर आहारामध्ये दर दिवशी दीड ते दोन किलो ऍझोला खाद्यात दिले तर दिवसाला दोन लिटरपर्यंत दुधात वाढ होऊ शकते.
  • एझोला मधील पोषक तत्वांचा विचार केला तर, यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 25 टक्के, खनिजे व 10 ते 12 टक्‍क्‍यांपर्यंत असते.ऍझोला मध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते.
  • तसेच यामध्ये प्रथिने व तंतुमय पदार्थ त्यांचे प्रमाण कमी असते त्यामुळे ही वनस्पती कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम,तांबे,जस्त व बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत वाढ होते.

 दुधाळ जनावरांच्या खाद्यात अझोला चा वापर केल्याने होतात हे फायदे

  • याचा खाद्यात वापर केला तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढण्यास मदत होते.
  • इतर पशुखाद्याच्या खर्चा मध्ये 10 ते 15 टक्के बचत होते.
  • जनावरांचे गुणवत्ता वाढून रोगप्रतिकारकशक्ती वाढते व आरोग्य सुधारते.
  • अझोलामुळे दूध,दुधाची फॅट व वजन यामध्ये वाढ होते.
  • ऍझोलाचा वाफ्यातून काढण्यात आलेले पाणी हे नत्रयुक्त,खनिजयुक्त असल्यामुळे पिकांसाठी पोषक म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.

अझोलाच्या वाफ्याचे व्यवस्थापन

  • याची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी कमीत कमी एक किलो ताजे शेण, 50 ग्रॅम खनिज मिश्रण व 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे.
  • सहा महिन्यांनी अझोला साठी  तयार करण्यात आलेला वाफा स्वच्छ करावा.
  • वाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच ठेवावी.
  • वाफेतून अजोला दररोज काढावी नाही तर त्याचे एकावर एक थर तयार होतात व किडींचा प्रादुर्भावहोतो.
  • दर 10 ते 15 दिवसांनी अझोला च्या वाफयामधील 25% पाणी बदलून त्या ठिकाणी स्वच्छ पाणी ओतावे. तसेच दोन महिन्यानंतर वाफ्यातील 50% माती बदलून नवीन चांगली काळी माती टाकावी.
English Summary: azola is benificial feed animal useful for milk growth
Published on: 28 October 2021, 02:11 IST