भारतात पशुधनाची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. भारतात म्हैसवर्गीय,गाय वर्गीय जनावरांसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ही 40 कोटींच्या जवळपास आहे.एवढ्या प्रचंड पशुधनासाठी लागणारा चारा, पशुखाद्याचा प्रश्न प्रत्येक वर्षी आपणास समोर एक आव्हान म्हणून उभा असतो.
दुग्ध व्यवसायात 65 ते 70 टक्के खर्च पशुखाद्य वर होतो.प्रत्येक जनावराला हिरवा चारा,वाळलेली वैरण, पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि जीवनसत्व योग्य प्रमाणात देणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी पशुपालकांनी चारा व्यवस्थापन यावर विशेष भर आणि लक्ष दिले पाहिजे. या लेखात आपण मुरघास आणि ऍझोलायाबद्दल माहितीघेऊ.
मुरघास
मुरघास म्हणजे हिरव्या वैरण यातील पोषणमूल्य घटकांचे जतन करणे. खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात उपलब्ध असणारे अतिरिक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी करून वैरणीत 30 टक्के शुष्काशआणि 70% आद्रता असताना कुट्टी करून मुरघास टाकीत हवाबंद स्थितीत मुरण्यासाठी साठवली जाते. या हिरव्या वैरणीचा साठवण्याच्या पद्धतीला आपण मुरघास बनवणे असे म्हणतात.मुरघास बनवल्यामुळे हिरवी वैरण यातील पोषण घटकांच्या जतन करता येते.हिरव्या वैरणीचा टंचाईच्या काळात, हिरव्या वैरणीला पर्याय म्हणून मूरघास उपलब्ध करून देता येते.
मुरघास तयार करण्याची प्रक्रिया
1-हिरवा चारा फुलोऱ्यात असताना कापा.
2-कुट्टी यंत्राच्या साह्याने हिरव्या चाऱ्याची कुट्टी करावी.
3- सुरुवातीला चाऱ्याचा थर मुरघास टाकीत / प्लास्टिक पिशवीत अथवा एखाद्या पिंपात अंथरावा,चाऱ्याच्या थरांमध्ये हवा न राहण्यासाठी दाब द्यावा.
4-चाऱ्याच्या थरावर जैविक संवर्धकशिंपडावे. जैविक संवर्धकहे पाणी,त्यामध्ये गुळ,मीठ व दह्याचे मिश्रण यांचेएकजीव द्रावण असते.अशा रीतीने पूर्ण टाकी भरून घ्यावी व प्रत्येक थरानंतर दाब द्यावा जेणेकरून हवा आज राहणार नाही व सरतेशेवटी मुरघास टाकी बंद करावी.
5- मुरघास टाकीत चारा 45 दिवस हवाबंद अवस्थेत ठेवावा.
6- पिवळसर सोनेरी रंगाचा व आंबुस गोड वासाचा मुरघास तयार होतो.
7- मुरघास चविष्ट असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
अझोला
- अझोला लागवडीकरिता दोन मीटर लांबी, दोन मीटर रुंदी व 0.2मीटर खोलीचा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या पाण्याचा डोह वापरावा.
- या डोहावर सावली राहील याची काळजी घ्यावी.
- डोहाच्या तळ्यामध्ये प्लास्टिकचे शीट घालावी. त्यानंतर 10 ते 15 किलो सुपीक माती या शीट वर एकसंध रित्या अंथरावे.
- दहा लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन किलो शं आणि 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट चे मिश्रण करुन या डोहात ओतावे.
- त्यानंतर डोहामध्ये दहा सेंटीमीटर उंचीएवढे पाणी ओतून,एक किलो शुद्ध अजोला वनस्पती सोडून द्यावे.
- 21 दिवसानंतर या डोहात पूर्ण वाढ झालेली अजोला शेवाळ आपल्याला मिळेल.
- दर आठ दिवसाआड एक किलो शेण 30 ग्रॅम सुपर फॉस्फेटचेमिश्रण घालावे.
- महिन्यातून एकदा डोहातील पाच किलो माती काढून नवीन माती टाकावी.
- डोहातील 25 ते 30 टक्के पाणी दहा दिवसांतून एकदा बदलून टाकावे.
- अझोला वनस्पती हे पशुखाद्य म्हणून गाई,म्हशी,वराह, कुकुट व मत्स्य पालन व्यवसाय वापरता येते.
अझोला चे फायदे
1-अझोला हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.
2- तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे पचायला हलका आहे.
3- दुधाळ जनावरांमध्ये जवळपास 15 ते 20 टक्के आंबा वन खाद्य ऐवजी अजोला खाद्य वापरता येते.
4-दुधाळ जनावरांना मध्ये दूध उत्पादन 20 टक्क्यांनी वाढते.
Published on: 22 December 2021, 02:55 IST