गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर लम्पीचा कहर बघायला मिळत आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना कृषिमंत्री याबाबत जास्त लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातील वाढता लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये लम्पीचा कहर पाहायला मिळत आहे.
यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 1406 बाधित जनावरांची संख्या सिल्लोडमध्ये आहे. तसेच याच तालुक्यात सर्वात जात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जात आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात देखील याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव पाहायला मिळत आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 हजार 841 बाधित जनावरे आदळून आली आहेत.
यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 1406 बाधित जनावरे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आढळून आले असून, सर्वाधिक 103 जनावरांचा मृत्यू देखील सिल्लोड तालुक्यात झाले आहे. यामुळे इतर तालुक्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
असे असताना शेतकरी मात्र प्रशासनाकडून मिळत नसल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 4 हजार 62 गोवंशीय पशूधनाच्या नुकसान भरपाईपोटी पशुपालकांच्या खात्यावर 10.44 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
डाळींब 251 रुपये किलो, शेतकरी मालामाल
असे असले तरी अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत, मात्र त्याची भरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. यामुळे कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी काय? यावर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर शेतकऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.
महत्वाच्या बातम्या;
घ्यायक गाडी, पाण्याला जार आणि चहा, मजुरांना आलेत अच्छे दिन..
कुस्तीगीर परिषदेवर पुन्हा शरद पवारांचाच दबदबा, भाजपला कोर्टाचा दणका
नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
Published on: 11 November 2022, 09:53 IST