राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारित पुनर्रचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. या कार्यक्रमांतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन वाढविणे, वैरणीची उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, नाविण्यपुर्ण उपक्रमांस प्रोत्साहन देणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशुपालन फार महत्त्वाचे आहे. वराह, बकरी आणि मेंढीपालन यांच्या माध्यमातून शेतकरी अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात. राज्य आणि केंद्र सरकार विविध योजनांमधून पशूसंवर्धनासाठी अनुदान देत आहे.
वराहपालनासाठी किती अनुदान मिळणार -
50 मादी आणि 5 नरांसाठी 15 लाख रुपये.
100 मादी आणि 10 नरांसाठी 30 लाख रुपये.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
प्रकल्पात अर्जदाराच्या वाट्याचा पुरावा
प्रकल्पात जोडलेल्या शेतकऱ्यांची यादी
अर्जदाराचा पत्ता पुरावा
शेवटच्या 3 वर्षांचे ऑडिट केलेले आर्थिक विवरण (कंपनीच्या बाबतीत)
मागील 3 वर्षांचे आयकर विवरण
मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
मुख्य प्रवर्तकाचे पॅन/आधार कार्ड
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
प्रशिक्षण प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र,स्कॅन केलेला फोटो
या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र अर्जदारांना www.nlm.udyamimitra.in द्वारे NLM उद्योजकता योजनेसाठी अर्ज करू शकता.
Published on: 07 October 2023, 06:21 IST