भारतात दुध उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रयोग राबवण्यात येतात, नवनवीन शोध शास्रज्ञ लावत असतात. मध्य प्रदेश मध्ये देखील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने कृत्रिम रेतनाने अशी टेक्निक विकसित केली आहे ज्याने गाई किंवा म्हशीमध्ये फक्त वासरी किंवा पायडिचाच जन्म होईल.यामुळे गाई व म्हशी वाढतील आणि साहजिकच दुधाचे उत्पादन वाढेल.
पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट याद्वारे साध्य केले जाणार आहे, जे सरकार चांगल्यारित्या साध्य केले जात आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केवळ पशुपालनाद्वारे पूर्ण केले जाऊ शकते. सध्या, कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक रेतन द्वारे अनेक वेळा वासरू किंवा पायडू जन्माला येतात.
पशुवैद्यकीय सेवा उपसंचालक डॉ.मनोज कुमार शर्मा यांनी सांगितले की, मध्यप्रदेश पशुसंवर्धन विभागाने दुध उत्पादनात वाढीसाठी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान सेक्स स़ाटेर्ड सीमन टेक्निक आणली आहे. यामुळे गाई म्हशीना केवळ वासरी किंवा पायडी जन्माला घालता येतील. जिल्ह्यात या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विभागाकडूनही केला जात आहे. पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक आणि पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक पशुवैद्यकीय क्षेत्र अधिकारी यांनी देखील पशुवैद्यकीय रुग्णालय, दवाखाना आणि कृत्रिम रेतन केंद्र आणि त्या भागातील प्रगत शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन याविषयीं अवगत केले आहे.
सेक्स स़ाटेर्ड सीमन टेक्निकचा लाभ काय होतोय नेमका
या तंत्राचा फायदा असा आहे की आज दुग्ध उत्पादनासाठी मादी जनावरांची गरज आहे जी या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने पूर्ण केली जाईल आणि उत्पादन आणि दुभत्या जनावरांची संख्या वाढल्यामुळे निराधार गाय सोडण्याची सवय कमी होईल आणि दूध उत्पादनात चांगलीच वाढ होईल आणि जर असे झाले तर प्रत्येक अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी गाय आणि म्हैस पालन मध्ये अधिकच रुची दाखवेल.
हे तंत्र रतलाम जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील 200 प्राण्यांमध्ये वापरले आहे आणि पशुना यूआयडी चिन्हांकित करून इनारफ सॉफ्टवेअरवर माहिती अपलोड केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रगत आणि प्रगतिशील पशुपालक शेतकरी या तंत्राद्वारे त्यांच्या जनावरांमध्ये रेतन करण्याच्या तयारीत आहेत.
ह्या तंत्राची फी किती आहे
सेक्स साटेर्ड सीमनची फी सामान्य आणि मागासवर्गीय पशुपालकांसाठी ४५० रुपये आणि एससी/एसटी प्रवर्गातील पशुपालकांसाठी ४०० रुपये आहे. सेक्स साटेर्ड सीमनने रेतन केलेल्या सर्व प्राण्यांमध्ये, त्या प्राण्याचे यूआयडी टॅग आणि त्याची संतती चिन्हांकित करून माहिती इनारफ सॉफ्टवेअरवर अपलोड केली जाईल. सेक्स साटर्ड हे सेंट्रल सीमेन इन्स्टिट्यूट भदभदा भोपाळ येथे तयार आणि साठवले गेले आहे. गायी आणि म्हशींच्या जातीच्या सुधारणेसाठी तयार केलेल्या वीर्यामुळे 90 टक्के वासरी आणि पायड्या तयार होतील.
Published on: 13 September 2021, 12:33 IST