Animal Husbandry

संकरित गाईच्या दुधाची क्षमता जास्त प्रमाणात असते,जास्त दूध देणाऱ्या गाई चा मागचा भाग मोठा असतो.तसेच त्या गायीचे चारही सड सारख्या आकाराचे असतात.तसेच सड लांब आकाराचे असतात.कासेच्या शिरा मोठा व लांब दिसतात.

Updated on 25 September, 2021 2:07 PM IST

 संकरित गाईच्या दुधाची क्षमता जास्त प्रमाणात असते,जास्त दूध देणाऱ्या गाई चा मागचा भाग मोठा असतो.तसेच त्या गायीचे चारही सड सारख्या आकाराचे असतात.तसेच सड लांब आकाराचे असतात.कासेच्या शिरा मोठा व लांब दिसतात.

 जर्सी गाईंचे व्यवस्थापन

  • गोठ्याचे नियोजन:

गोठा हा नेहमी उंचावर असावा म्हणजे त्यामध्ये उजेड येईल तसेच गोठ्यामध्ये खेळती हवा राहील अशा पद्धतीची रचना हवी.तसेच छप्पर ची उंची 15 फूट असावी.जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा व त्यामध्ये जनावरांना मूत्र वाहक नळी सुद्धा करावी. प्रत्येक जनावरांसाठी मोकळी जागा  असावी तसेच जर गोठा धुतला सर त्याचे पाणी शेतीला जावे असे व्यवस्थापन करावे.

  • दूध काढताना घ्यायची काळजी :

दूधकाढणे आदी गोठा स्वच्छ धुवावा.तसेच गाईची  व कास स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या व स्वच्छ फडक्याने कास पुसून स्वच्छ करावी.दूधकाढणाऱ्यामाणसानेआपलेहातस्वच्छधुवावेत.तसेच त्याची नखे काढलेली असावीत. दूध काढताना फिक्स टाईम ठेवावा.दुधाच्या भांड्यामध्ये काढायचे आहे ते भांडे स्वच्छ असावीत.

  • दुभत्या गाईंचे संगोपन:

दुभत्या गाई ला रोज कमीत कमी 15 ते 20 किलो हिरवा चारा व पाच ते आठ किलो कोरडा चारा द्यावा. तसे शरीराचे पोषण व्हावे म्हणून दीड ते दोन किलो खुराक  सुद्धा द्यावा.तुम्ही गाईला सारखे बांधून ठेवता रोज दोन ते तीन तास फिरायला मोकळे सोडा म्हणजे गाईचा व्यायाम होईल.

  • माजावर आलेल्या गायचे व्यवस्थापन :

 गाई 21 दिवसाच्या अंतरावर माजावर येते.माजाची लक्षणे दिसल्यास पासून 10 ते 18 तासानंतर माजदाखवत नाही किंवा काही गाई अशा आहेत ज्या दोन ते तीन महिन्यानंतर माजावर येतात त्यांची तपासणीकरून घ्यावी.

  • खाद्य व्यवस्थापन:

ज्या ठिकाणी हिरवा चारा आहे त्या ठिकाणी गाभण गाईला फिरायला सोडावे. म्हणजे त्यांच्या ते फायद्याचे ठरते. गाईंना ताजी वैरण भेटते तसेच यांचा व्यायामही चांगला होतो.तसेच मोकळी हवा व सूर्यप्रकाश मिळतो.जर तुमच्याकडे हिरवा चारा उपलब्ध नसेल तर कुठून तरी नियोजन करून गोठ्यामध्ये हिरवा चारा आणून गाईंना खायला घालावा. गाभण गाईच्या शेवटच्या दोन महिन्यात गर्भाची वाढ वेगाने होते. त्यामुळे चाऱ्यामध्ये वाढ करावी तसेच त्यांच्या शरीर पोषणासाठी  दीड ते दोन किलो पशुखाद्य द्यावे. जर तुम्ही खाद्य चांगल्या प्रकारे दिले तर गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

  • लहान वासरांचे व्यवस्थापन:

जेव्हा वासरू जन्माला येते त्यावेळी त्याच्या नाकातोंडात चिकट द्रव्य स्वच्छ करून घ्यावे.तसे पाहायला गेले तर काही आपल्या वासराला चाटत पूर्णपणे साफ करतात परंतु त्यामुळे कातडी कोरडी पडते व त्यांचे श्वास व रक्ताभिसरण व्यवस्थित होते. जर गाईने वासराला चाटते नाहीतर आपण स्वच्छ कापड घेऊन वासराला स्वच्छ करावे व छाती दाबुन कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. वासराच्या शरीरापासून 2 ते 5 सेंटिमीटर अंतरावर नाळ बांधा तसेच लीगेचेरच्या खाली एक सेंटिमीटर वरतोडा. त्याठिकाणी अँटिबायोटिक औषध लावा. नंतर गोठ्यातील सर्वओली कपडे काढून टाकावी तसेचती स्वच्छ आणि कोरडा गोठा करावा.

English Summary: approprite management of jersy cow
Published on: 25 September 2021, 02:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)