भारता पशुपालन व्यवसायात अत्यंत जलद गतीने विकास करणारा देश आहे. पशु उत्पादनात आपला देश थोडा कालावधीतच स्वयंपूर्ण होईल. जगामध्ये भारताचा दूध उत्पादनात प्रथम, अंडी उत्पादनात सातवा तर मांस निर्यातीत सातवा क्रमांक लागतो. भारतातील पशुपालन व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते.
त्यातील महत्त्वाच्या अडचणी, दूध उत्पादन व दूध गुणवत्ता या आहेत. भारत हा पशुपालन व्यवसाय अत्यंत जलद गतीने विकास करणारा देश आहे. दुग्धोत्पादन व्यवसायात गाईंचे आरोग्य निरोगी असले तर त्यांच्यापासून उच्च प्रतीचे दुग्ध उत्पादन मिळते. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.या लेखात आपण गाईला येऊ शकणारा अंथ्रेक्स या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत.
गाईंमध्ये आढळणारा अंथ्रेक्स आजार
गाई मध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा रोग असून घातकही आहे. या रोगामुळे च्या नावावर जास्त दिवस जिवंत राहत नाही.हा रोग मोठे बीजाणू तयार करणाऱ्या आयताकृती जीवाणूपासून होतो. त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलस अंथ्रेक्स असे आहे. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. बेसिलस जिवाणू अति उच्च प्रतीचे घातक घटक निर्माण करतात. त्यामुळे जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आढळून येते. या जिवाणू ला बीज तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे जिवाणूंची बिजानी शरीरात प्रवेश केल्यानंतर तीन ते सात दिवसानंतर दिसून येतात.
जनावरांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर जनावर दोन दिवसात मृत्युमुखी पडते. पायांना खुरी असणारी उदा. हरीण,, गाय, शेळी व मेंढी या जनावरांमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने ज्यावेळी जनावरे चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात त्यावेळी हे जिवाणू श्वासोच्छवासाचा द्वारे शरीरात प्रवेश करतात. या जिवाणूंना कोणत्याही प्रकारचा वास चव,,रंग नसतो नसतो. तसेच डोळ्यांना सहजरीत्या दिसत नाही. या जिवाणूंचा प्रवेश जनावरांप्रमाणे माणसातही होत असतो.
लक्षणे
- अचानक जनावर मृत्युमुखी पडते जनावर सर्वसामान्य दिसत असताना दोन ते तीन तासात मृत्युमुखी पडणे हे प्रमुख लक्षण दिसून येते.
- जनावरांना उच्च तापमान, घाबरण्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापणे अशी ही काही जनावरे थोड्याबहुत प्रमाणात लक्षणे दाखवतात.
- श्वासाश्वासात येणारा अडथळा, धाप लागणे, जनावर जमिनीवर पडणे अशी लक्षणे मृत्यूपूर्वी 24तास आगोदर दिसून येतात.
- जनावर मृत्युमुखी पडल्यानंतर शरीरातील रक्त गोठत नाही. त्यामुळे शरीराच्या उघड्या भागातून जसे की नाक, कान आणि तोंड यामधून रक्तप्रवाह चालू होतो.
या रोगावरील उपचार व नियंत्रण
- रोगाची लागण झाल्यानंतर जनावर तात्काळ मृत्युमुखी पावत असल्यामुळे आपणाला यावरती उपाय करणे शक्य नसते. त्यामुळे हा रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करणे फायद्याचे ठरते.
- प्रतिबंधक उपायांमध्ये प्रतिजैविक चा वापर करण्यात यावा. पेनिसिलीन,टेट्रासायक्लीन,इरीथ्रोमायसीन इत्यादींचा समावेश होतो.
Published on: 12 December 2021, 09:15 IST