Animal Husbandry

Agriculture News: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेती समवेतचं शेतीपूरक व्यवसाय करीत आहेत. खरं पाहता आपल्या देशात शेती (Farming) हा एक प्रमुख व्यवसाय आहे. मात्र आता पशुपालन (Animal Husbandry) हा त्याच्याशी निगडीत व्यवसाय देखील व्यावसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे.

Updated on 25 July, 2022 5:58 PM IST

Agriculture News: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेती समवेतचं शेतीपूरक व्यवसाय करीत आहेत. खरं पाहता आपल्या देशात शेती (Farming) हा एक प्रमुख व्यवसाय आहे. मात्र आता पशुपालन (Animal Husbandry) हा त्याच्याशी निगडीत व्यवसाय देखील व्यावसायिक स्तरावर केला जाऊ लागला आहे.

आपण असे म्हणू शकतो की, भारतात पशुसंवर्धन आणि शेती हातात हात घालून चालतात. आज जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे, तेव्हा शेती हा सुद्धा फायदेशीर व्यवहार झाला आहे आणि त्यासोबत पशुपालन (Cow Rearing) केले तर तो फायद्याचा सौदा ठरतो. त्यामुळेच सरकारही शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे.

पशुपालनाला व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येही प्राधान्य दिले जात आहे. आज आपले शेतकरी बांधव दुभत्या जनावरांचे संगोपन करून चांगला नफा (Farmer Income) कमावत आहेत.

असे असतानाही आपल्या दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कशी वाढवायची हे पशुपालकांसमोर (Livestock Farmer) मोठे आव्हान आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा गवताबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे शेतकरी बांधव त्यांच्या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता अनेक पटींनी वाढवू शकणार आहेत.

बरसीम गवत:- हे प्राण्यांसाठी खूप चांगले गवत मानले जाते.  यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.  याने जनावरांचे पोट तर भरतेच शिवाय त्यांची पचनक्रिया बरोबर राहते, त्यामुळे त्यांची दूध देण्याची क्षमता वाढते.

जिरका गवत:- जिरका गवतही प्राण्यांसाठी खूप चांगले मानले जाते. यातील एक उत्तम गोष्ट म्हणजे या गवताला कमी सिंचनाची गरज असते. कमी पाण्याच्या प्रदेशात याची लागवड सहज करता येते. तसे, जिथे सहसा कमी पाऊस पडतो आणि पाण्याची कमतरता असते, तिथे पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे.

त्या क्षेत्रांसाठी, ते एक विशेष वरदान आहे. राजस्थानातील वाळवंटी प्रदेश या गवतासाठी योग्य आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा गवत लागवडीचा उत्तम काळ आहे. ज्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवावी लागते त्यांच्यासाठी हे गवत अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

नेपियर गवत:-हे गवत दिसायला उसासारखे असून प्राण्यांसाठी अतिशय चांगले खाद्य मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गवत फार कमी वेळात वाढते.  म्हणजेच ते दीड ते दोन महिन्यांत तयार होते. याच्या सेवनाने जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढते आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते.

English Summary: animal husbandry this grass will increased milk production of animal
Published on: 25 July 2022, 05:58 IST