Animal Husbandry

शेतकरी बांधव फार पूर्वीपासून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करत आले आहेत. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव पशुपालनाला अधिक पसंती दर्शवतात. सुरुवातीला दुय्यम व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे बघितले जात होते मात्र आता हा व्यवसाय मुख्य व्यवसायाची जागा घेऊ पाहत आहे. यामुळे आज आपण म्हशीच्या सर्वात उपयुक्त जातीविषयी जाणून घेणार आहोत. पशुपालन मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. यामुळे आज आपण सर्वाधिक दूध उत्पादन क्षमता असलेल्या म्हशींच्या जातीविषयी जाणून घेणार आहोत.

Updated on 17 April, 2022 7:21 PM IST

Animal Husbandry: शेतकरी बांधव फार पूर्वीपासून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करत आले आहेत. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधव पशुपालनाला अधिक पसंती दर्शवतात. सुरुवातीला दुय्यम व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे बघितले जात होते मात्र आता हा व्यवसाय मुख्य व्यवसायाची जागा घेऊ पाहत आहे. यामुळे आज आपण म्हशीच्या सर्वात उपयुक्त जातीविषयी जाणून घेणार आहोत. पशुपालन मुख्यता दुग्ध उत्पादनासाठी केला जातो. यामुळे आज आपण सर्वाधिक दूध उत्पादन क्षमता असलेल्या म्हशींच्या जातीविषयी जाणून घेणार आहोत.

मुऱ्हा म्हैस:- मुऱ्हा ही म्हशीच्या उत्कृष्ट जातींपैकी एक आहे. ही जात विशेषता दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. ही जात वर्षाकाठी 1000 ते 3000 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. या शिवाय या जातीच्या म्हशीचे दूध हे उत्कृष्ट दर्जाचे असते कारण की या जातीच्या म्हशीच्या दुधाला नऊ टक्के फॅट असतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याच जातीच्या एका म्हशीने सर्वात जास्त दूध पिण्याचा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या जातीच्या रेशमा या म्हशीने सुमारे 34 लिटर दूध घेऊन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या म्हशीने पहिल्या वेतात एका दिवसात वीस लिटर दूध दिले होते. या म्हशीने दुसऱ्या वेताच्या वेळी दिवसाला सुमारे 30 लिटरपर्यंत दूध दिले. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठी या जातीच्या म्हशीचे संगोपन करणे विशेष फायदेशीर ठरू शकते.

जाफराबादी म्हैस:- म्हशीचे ही जात देखील उत्कृष्ट दूध उत्पादनक्षमता असलेली आहे. ही जात विशेषता दुग्ध उत्पादनासाठी पशुपालक शेतकरी पाळत असतात. पशुपालक शेतकरी या जातीस विशेष पसंती दर्शवतात कारण की ही जात एका वर्षात सुमारे 2000 ते 2200 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. याशिवाय या जातीच्या म्हशीच्या दुधाची कॉलिटी देखील उत्कृष्ट असते कारण की या जातीच्या म्हशीच्या दुधाला नऊ टक्के फॅट बसत असतो.

पंढरपूरी म्हैस:- म्हशीची ही जात महाराष्ट्रातील एक देशी जात आहे. या जातीचे संगोपन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केले जाते. यामुळेच की काय या जातीला पंढरपुरी म्हैस म्हणून ओळखले जात असावे असा दावा केला जातो. पंढरपुरी म्हैस विशेषता महाराष्ट्रातच पाळली जाते. या जातीच्या म्हशीच्या दुधात आठ टक्के पर्यंतचा फॅट असतो असा दावा केला जातो. या जातीची दूध देण्याची क्षमता सतराशे ते आठशे लिटर प्रति वेत एवढी आहे. यामुळे निश्चितच ही जात देखील पशुपालक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.

English Summary: Animal Husbandry: Follow this 'buffalo' and earn a lot of money; Read about it
Published on: 17 April 2022, 07:21 IST