Animal Husbandry

कधीकधी पावसाच्या अनियमितपणामुळे किंवा असमाधानकारक पाऊस मान असल्यामुळे जनावरांचा कार्याचा ज्वलंत प्रश्न उभा ठाकतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत चार्यााचे नियोजन महत्त्वाचे ठरते. या लेखात आपण आपत्कालीन परिस्थितीत चारा पिकाचे नियोजन विषयी माहिती घेऊ.

Updated on 05 January, 2022 5:40 PM IST

कधीकधी पावसाच्या अनियमितपणामुळे किंवा असमाधानकारक पाऊस मान असल्यामुळे जनावरांचा कार्याचा ज्वलंत प्रश्न उभा ठाकतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत चार्‍याचे नियोजन महत्त्वाचे ठरते. या लेखात आपण आपत्कालीन परिस्थितीत चारा पिकाचे नियोजन विषयी माहिती घेऊ.

 आपत्कालीन परिस्थितीत चारा पिकांचे नियोजन….

  • यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध असलेल्या हिरव्या चाऱ्यापासून उत्तम प्रतीचा मुरघास उन्हाळ्यात चारा म्हणून वापरण्यासाठी पर्याप्त प्रमाणात बनवून ठेवणे महत्त्वाचे असते.
  • जर तीव्र दुष्काळाची परिस्थिती असेल तर हायड्रोपोनिक पद्धत वापरून मक्याचा हिरवा चारा तयार करणे.
  • तसेच ओझोलायाशेवाळ वर्गिय वनस्पतींची निर्मिती व त्यातून पशुखाद्य वरील खर्चात बचत करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
  • खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे जसे की ज्वारी, बाजरी, मका, तूर इत्यादी पिकांचे अवशेष म्हणजेच पाला किंवा कडबा भुस्सा इत्यादी गोळा करून त्यावर उत्तम प्रक्रिया करून सकस वैरणीत रूपांतर करून त्याचा वापर करता येतो.
  • तसेच उसाची संपूर्णपणे कुट्टी करावी व जनावरांना चारा म्हणून घालावी.
  • उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालताना त्यावर प्रक्रिया करावी.
  • चाऱ्याची टंचाई असताना शेळ्या-मेंढ्यांना अंजन, सौंदड, बाभूळ आणि पिंपळ इत्यादींच्या झाडांचा पाला देता येतो.त्यासोबतच 200 ते 300 ग्रॅम खुराक प्रति जनावरास द्यावा.

उसाचे वाढे यासारख्यां नीकस वैरणीवर प्रक्रिया करण्याची पद्धत

 उसाचे वाढे जास्त प्रमाणात जनावरांना खायला घातल्यास त्यातील ऑक्सालेट मुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअमचे शोषण होते व हाडे ठिसूळ होतात. तसेच जनावरांमध्ये वंध्यत्व येते, दूध कमी होते इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे उसाच्या वाड्यातील ऑक्‍सालेटचे प्रमाण कमी करून त्याचे पोषण मूल्य वाढविण्यासाठी साधी-सोपी प्रक्रिया करता येते.

 या प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य

 कळीचा चुना, मीठ, झारी, पाणी साठविण्यासाठी पिंप, कॅनआणि उसाचे वाढेइत्यादी.

 करावयाची प्रक्रिया

 दोन किलो कळीच्या शून्यात 15 ते 20 लिटर पाणी टाकून ठेवणे तसेच त्यास बरोबर स्वतंत्र मिठाचे दोन टक्के द्रावण तयार करावे. प्रति बारा तासाने ज्या पिंपात कळीचा चुना ठेवलेला आहे त्यामध्ये तीन लिटरपर्यंत चुन्याची निवळी तयार झालेली आढळेल. दहा किलो उसाच्या वाढ्यावर एक ते दीड लिटर चुन्याची निवळी व मिठाचे द्रावण शिंपडावे. कमीत कमी बारा तास त्याला मुरू द्यावे नंतर असे वाढे किंवा कुट्टी जनावरांना खाऊ घालावे.

English Summary: animal fodder mqanagement in emergency condition like as drought
Published on: 05 January 2022, 05:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)