Animal Husbandry

शेळीपालन करायचे म्हटले म्हणजे अनेकांच्या डोक्यात एकच गोष्ट असते ती म्हणजे कमी जागेत करता येणारा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय होय. तसे पाहायला गेले तर हे तेवढेच खरे देखील आहे. परंतु कुठल्याही व्यवसायाच्या यशामागे त्या व्यवसायाचे नियोजन आणि व्यवस्थापन हे देखील तितकेच गरजेचे असते.

Updated on 28 August, 2022 7:57 PM IST

शेळीपालन करायचे म्हटले म्हणजे अनेकांच्या डोक्यात एकच गोष्ट असते ती म्हणजे कमी जागेत करता येणारा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय होय. तसे पाहायला गेले तर हे तेवढेच खरे देखील आहे. परंतु कुठल्याही व्यवसायाच्या यशामागे त्या व्यवसायाचे नियोजन आणि व्यवस्थापन हे देखील तितकेच गरजेचे असते.

नक्की वाचा:Goat Rearing: पाळाल 'या' दोन प्रजातीच्या शेळ्या तर नक्कीच मिळेल शेळीपालनात यश

आता आपण शेळीपालनाचा विचार केला तर खूप वेगळ्या प्रकारच्या प्रजाती शेळ्यांमध्ये आहेत. काही शेळ्याच्या जाती आपल्या महाराष्ट्रीयन आहेत तर काही या इतर राज्यातील आहेत.परंतु शेळ्यांच्या जातीमध्ये काही विदेशी जाती देखील आहेत

ज्या आपल्याकडील जातींच्या तुलनेत खूप वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने खूप सक्षम आहेत. या लेखात देखील आपण अशाच एका विदेशी जातीच्या शेळीची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Goat Farming: शेळीच्या 'या' 4 जाती शेतकऱ्यांना मिळवून देतील चांगला नफा

शेळीपालनासाठी उपयुक्त विदेशी शेळी

 विदेशी शेळ्यांच्या जातीमध्ये 'अल्पाइन' ही शेळीची प्रजाती खूप महत्वपूर्ण असून तिचे मूळ स्थान स्वित्झर्लंड तसेच फ्रान्स आहे. हे शेळी पालनासाठी अत्यंत उपयुक्त असून तिचे दूध देण्याची क्षमता देखील खूप जास्त आहे. एवढेच नाही तर या शेळ्यांचे दूध एक पौष्टिक मूल्याच्या दृष्टीने देखिल उच्च दर्जाचे आहे व दुधातील फॅट्स म्हणजेच स्निग्धांशाचे प्रमाण तीन ते चार टक्क्यांपर्यंत असते.

ही शेळी दिवसाला पाच लिटर दूध देते. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये ही शेळी आढळत असून काळा,पांढरा,करडा एकत्रित मिक्स रंगांमध्ये देखील हे शेळी आढळते.  दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या शेळीला शिंगे असून नर जातीचे वजन 65 ते 80 किलो आणि मादी शेळीचे वजन 50 ते 60 किलोपर्यंत असते.

नक्की वाचा:Bussiness Tips: मत्स्यपालन म्हणजे मासे विकून नफा कमावणे नव्हे,त्यासोबत करा 'हे' व्यवसाय आणि मिळवा चांगला नफा

English Summary: alpine goat species is so benificial in goat rearing and so profitable
Published on: 28 August 2022, 07:57 IST