केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे,यासाठी सरकार पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देत आहे. यावर काम करताना सरकारने पशुपालकांना आता डिजिटल पातळीवर आण्याचा प्रयत्न करत ई-गोपाला एप लॉन्च केले आहे. पशुपालकांचे उत्पादन वाढविण्यासाठी या एपचा उपयोग होईल,असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान हे एप पंतप्रधान मोदींनी १० सप्टेंबर २०२० रोजी लॉन्च केले आहे.
ई- गोपाल एप हे आपण गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतो. आपल्या मोबाईल नंबरवरुन या एपवर नोंदणी करू शकतो. दरम्यान आपल्या समोर सहा पर्याय येतील. यात सर्वात आधी पर्याय दिसेल पशु आहाराचा. यात आपल्याला पशु आहाराविषयी पुर्ण माहिती मिळेल. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा पर्यायात आपल्याला जनावरांच्या रोगांची माहिती त्याचे उपचाराविषयी पुर्ण माहिती असेल. मेरा पशु आधार या पर्यायात शेतकरी सर्व जुन्या नव्या जातीच्या जनावरांची माहिती घेऊ शकतात.
काय आहे ई-गोपाल एप –
एक चांगल्या जातीच्या जनावरांची माहिती देणारे एक डिजिटल व्यासपीठ आहे. यात आपल्याला कृत्रिम गर्भधारण, पशुंची प्राथमिक चिकित्सा, लसीकरण, उपचार आणि पशु पोषण इत्यादीविषयीची माहिती या एपमधून मिळते. याशिवाय शेकऱ्यांसाठी सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांची माहितीही या अॅपमधून मिळणार आहे.
अलर्ट मेसेजमधून कळणार लसीकरणाची माहिती
अलर्ट पर्यायामध्ये पशुपालक आपल्या पशुंच्या लसीकरणाविषयी माहिती मिळवू शकतील. लसीकरण आपल्या जवळील कोणत्या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये चालू आहे. किंवा लसीकरण कॅम्प कुठे याची माहिती आपल्याला यातून मिळेल. कृत्रिम गर्भधारणा पद्धती आणि चांगल्या जातीच्या जनावरांचे वीर्य सीमेन विक्रीची माहिती पशुपालकांना यातून मिळणार आहे.
Published on: 21 September 2020, 01:54 IST