Animal Husbandry

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी विकसित प्राण्यांसाठी केलेली देशातील पहिली कोरोना लस अनोकोव्हॅक्स लॉन्च केली.

Updated on 13 June, 2022 6:41 PM IST

 केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी विकसित प्राण्यांसाठी केलेली देशातील पहिली कोरोना लस अनोकोव्हॅक्स लॉन्च केली.

ही लस हरियाणा येथील आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स भारतात एन आर सी ने विकसित केले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, Encovax प्राण्यासाठी निष्क्रिय SARS-CoV-2 डेल्टा( covid-19)लस आहे.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, enovax पासून निर्माण होणारी प्रतिकारक शक्ती SARS CoV-2 चाट डेल्टा आणि ओमीक्रोन  या दोन्ही प्रकारांना तटस्थ करते. या निवेदनात म्हटले आहे की या लस्सी मध्ये सहाय्यक म्हणून अल्ट्राइड्रोजेल सोबतच निष्क्रिय SARS-CoV-2( डेल्टा) प्रतिजन आहे.

ही लस कुत्रे, सिंह, बिबटे, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आयसीएआर-  एन आर सी द्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि डायग्नोस्टिक किट डिजिटल पद्धतीने जारी केली

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..

 यावेळी ते म्हणाले की, शास्त्रज्ञांच्या अथक योगदानामुळे देश स्वतःची लस आयात करण्याऐवजी स्वतःची लस विकसित करण्यात यशस्वी झाला आहे.

ही खरोखरच मोठी उपलब्धी असल्याचे देखील केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारतातील प्रमुख कृषी संशोधन संस्था असून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

 याआधी रशियाने विकसित केली जगातील पहिली प्राण्यांवरील  लस

 दरम्यान या दृश्याने कोरोनाविषाणू विरुद्ध प्राण्यांसाठी जगातील पहिलं सादर केली होती. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कृषी नियामक रोसेलखोझ नादझोर यांनी सांगितले की, लसीकरणानंतर प्राण्यांमध्ये सहा महिन्यासाठी प्रतिकारशक्ती टिकते. रशियन शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की या लसीचा वापर व्हायरस मधील बदल थांबवू शकतो.

कृषी नियामकाच्या उपप्रमुख यांनी सांगितले होते की, प्राण्यांसाठी ही लस रोसेलखोझनाडझोर युनिटने विकसित केली आहे आणि तिला cornivek kov असे नाव देण्यात आले आहे. या covid-19 लसीची बिव्हर, कोल्हा, मांजर आणि कुत्रा व चाचणी करून अशा प्राण्यांमध्ये विषाणू विरुद्ध प्रतिपिंड तयार झाल्याचे दिसून आले होते.

नक्की वाचा:Sugarcane juice: या समस्या असल्यास चुकूनही पिऊ नका ऊसाचा रस, नाहीतर होईल नुकसान

नक्की वाचा:चिंता वाढली! कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; जाणून घ्या आजची आकडेवारी   

English Summary: acnovax is first animal corona vaccine launch in india for fight against corona in animal
Published on: 13 June 2022, 06:41 IST