जगात पशुपालन विशेषता म्हशीचे पालन फार पूर्वीपासून केले जात आहे. पशुपालक शेतकरी म्हशीचे पालन करून चांगली तगडी कमाई करत आहेत. साधारणतः म्हैस हि 1 लाखाच्या घरात बाजारात उपलब्ध होते पण आज आपण अशा एका वीवीआयपी म्हशीविषयी जाणुन घेणार आहोत तिची किमत हि एखाद्या लक्सरी कारपेक्षा कमी नाहीय. हो खरंच! पंजाब मध्ये एक पशुपालक शेतकऱ्याकडे तब्बल 51 लाखांची म्हैस आहे.
ह्या म्हशीचे नाव 'सरस्वती' असे आहे. सरस्वती तिच्या किमतीमुळे एखाद्या फिल्म स्टार सारखी फेमस आहे आणि कायमच चर्चेत असते. 'सरस्वती' म्हशीवर लक्ष्मी प्रसन्न आहे असेच म्हणावे लागेल. चला तर मग कृषी जागरणच्या वाचक मित्रांनो जाणुन घेऊया सरस्वती ह्या वीवीआयपी म्हशीविषयी.
51 लाखांची सरस्वती….
मित्रांनो सरस्वती म्हैस चर्चेत असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिची लक्षणीय किमत. सरस्वती म्हैस हि पंजाब मधील लुधियाना येथील पशुपालक शेतकरी पवित्र सिंह ह्यांनी हरियाणाच्या पशुपालक शेतकऱ्याकडून 51 लाख रुपयाला खरेदी केली आहे. अहो आई तर आई ह्या आईचे मूल हि आहे तेवढंच विआयपी! मित्रांनो सरस्वती च्या पारडूची बोली जन्माला येण्यापूर्वीच लावली गेली आणि ते पारडू तब्बल 11 लाख रुपयाला विकले गेले आहे. मित्रांनो सरस्वती म्हशीचे मालक हे माचीवाड्यापासून 8 किमी अंतरावर असलेल्या राजूर गावात राहतात. पवित्र सिंह ह्यांच्याकडे 17 एकर शेती आहे, तसेच ते पशुपालन देखील करतात आणि ह्यातून चांगली कमाई करतात. ह्या पशुपालक शेतकऱ्यांच्या गोठ्यात 12 गायी आणि 4 म्हशी आहेत.
ह्या म्हशीचे नाव 'सरस्वती' असे आहे. सरस्वती तिच्या किमतीमुळे एखाद्या फिल्म स्टार सारखी फेमस आहे आणि कायमच चर्चेत असते. 'सरस्वती' म्हशीवर लक्ष्मी प्रसन्न आहे असेच म्हणावे लागेल. चला तर मग कृषी जागरणच्या वाचक मित्रांनो जाणुन घेऊया सरस्वती ह्या वीवीआयपी म्हशीविषयी.
'सरस्वती' का आहे एवढी महाग
मित्रांनो सरस्वती म्हैस हि किमतीमुळे आणि तिच्या दुध उत्पादन क्षमतेमुळे एवढी प्रसिद्ध आहे. सरस्वती म्हैस हिने दिवसाला 33.131 लिटर दुध देऊन एक विक्रम बनवला आहे. ती जगातली सर्व्यात जास्त दुध देणाऱ्या म्हशीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान मधील नजा ह्या म्हशीच्या नावावर सर्वात जास्त दुध देण्याचा विक्रम आहे. नजा म्हशीने एका दिवसात 33.800 लिटर दुध देऊन हा विक्रम तिच्या नावावर केला आहे. पवित्र सिंह सांगतात की, लवकरच सरस्वती नजा म्हशीचा हा विक्रम मोडीत काढेल आणि नवीन विक्रम प्रस्थापित करेल.
सरस्वतीचा खुराक नेमका आहे तरी काय?
सरस्वतीचा खुराक/आहार हा सामान्य म्हशी सारखाच आहे. तिला इतर पशुप्रमाणे फक्त चारा आणि धान्य दिलेजाते. सामान्य म्हशीसारखाच आहार असून देखील सरस्वती इतर म्हशीपेक्षा जास्त दुध देत आहे हि खरं तर तिची विशेषता आहे. आणि हेच कारण आहे की सरस्वती हि एवढी महाग आहे आणि नेहमीच चर्चेत असते. मित्रांनो सरस्वती हि एक विआयपी म्हैस आहे आणि ते ह्यावरून समजते की, तिच्या देखरेखीसाठी दोन कर्मचारी तैनात आहेत.
Published on: 27 October 2021, 09:29 IST