Animal Husbandry

जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करत आहे. पशुधनाची ऑनलाईन माहिती मिळण्यासाठी पशुसंवर्धन हे उपक्रम राबवत आहे.

Updated on 06 February, 2022 7:09 PM IST

जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम पशुसंवर्धन विभाग करत आहे. पशुधनाची ऑनलाईन माहिती मिळण्यासाठी पशुसंवर्धन हे उपक्रम राबवत आहे.

पशुसंवर्धन कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार राबवत असलेल्या या उपक्रमातून इनाफ या प्रणाली मधून जिल्ह्यातील तब्बल 5 लाख 83हजार 73 जनावरांची टँगिंगकरण्यात आली आहे.

 जनावरांची माहिती ऑनलाइन उपलब्ध – जनावरांची माहिती उपलब्ध होण्यासाठी जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावा हा उपक्रम सरकार राबवत आहे. हे काम पशुसंवर्धन विभाग इनाफ प्रणालीतून करत आहे. जनावरांना 13अंकी नंबर दिला जात आहे. यात जनावरांची सर्व माहिती अपलोड केली जात आहे.

यामध्ये सर्वप्रथम पशुपालकांचे नाव,मोबाईल नंबर,आधार क्रमांकपत्ता  असणार तसेच जनावरांची सर्व माहिती सविस्तर असणार. सध्या 5 लाख 83 हजार 73 जिल्ह्यात जनावरांची ऑनलाईन माहिती उपलब्ध केली आहे. जनावरांची ऑनलाईन माहिती त्वरित उपलब्ध झाली आहे. तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांना म्हैस, गाय, शेळी,मेंढी इ. जनावरे टँगिंगकरून घेण्यास सूचना दिल्या आहेत.

तालुक्या नुसार टॅगिंग केलेली जनावरे

  • अर्धापूर- 22330
  • भोकर -27 हजार 330
  • देगलूर 37 हजार 408
  • धर्माबाद- 15026
  • हदगाव 46 हजार 940
  • माहूर तेवीस हजार सातशे सात
  • किनवट 56 हजार 905
  • लोहा 52271
  • मुखेड 60873
  • नायगाव 46 हजार 873 इत्यादी

(संदर्भ-मीEशेतकरी)

English Summary: 5 lakh animal completed by tagging get all information by online
Published on: 06 February 2022, 07:09 IST