गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने यावर 35 रुपयांपेक्षा दर कमी केले जाणार नाहीत असे सांगितले मात्र परिस्थिती वेगळी आहे.
सध्या लिटरला मिळणारा ३८ रुपयांचा दर महिनाभरात 7 ते 8 रुपयांनी घसरले आहे. सध्या ३०-३२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशांतर्गत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
याउलट पशुखाद्याचे दर मात्र वाढले आहेत. त्यामुळे दूध धंदा तोट्यात जात असल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत. दुधाचे दर कमी होऊ लागताच दर टिकून राहण्यासाठी समिती केली.
शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..
किमान ३५ रुपये दर कायम राहावा यासाठी उपाययोजना करण्याचे जाहीर केले. मात्र अद्याप उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
टोमॅटो ६० रुपये किलोने मिळणार! सरकारने सुरु केली योजना, जाणून घ्या..
राज्यात ७० सहकारी व ३०० पेक्षा जास्त खासगी दूध संघाच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील चाळीस टक्के दुधाची पावडर, बटर होते, तर साठ टक्के दूध ग्राहकांना पाऊचमधून विकले जाते.
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण
Published on: 11 July 2023, 09:27 IST