बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन,पशु पालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय करतात.यामध्ये शेळीपालन व्यवसाय हा अगदी कमी खर्चात आणि कमी जागेत करता येणारे व्यवसाय आहे.
तसेच शेळीला गरीबाची गाय असे देखील म्हटले जाते. कारण शेळीपालनाला फार खर्च येत नाही. अगदी झाड पाल्यावर देखील शेळी स्वतःचा गुजराण करू शकते. परंतु हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या परवडण्याजोग्या व्हावा आणि त्याला एक व्यावसायिक स्वरूप यावे यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना आखण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे.
नक्की वाचा:तुम्हाला माहिती आहे का या आयुर्वेदिक वनस्पती चे आरोग्यदायी फायदे ? वाचा सविस्तर माहिती
याचाच एक भाग म्हणून शेळीपालनामध्ये एक अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला असून शेळ्यांची जातिवंत पैदास करता यावी यासाठी कृत्रिम रेतन हा एक पर्याय समोर आणला आहे. यासाठी राज्यांमध्ये तीन हजार केंद्रे उघडण्यात येणार असून जातिवंत शेळ्यांच्या निर्मितीतून शेळीपालन करणाऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे.
सध्या ही पद्धत राबविण्यात येत असून आतापर्यंत 60 टक्के शेळ्यामध्ये गर्भधारणा या पद्धतीने करण्यात आली आहे. कारण जातीवंत शेळ्यांची पैदास हे शेळीपालन व्यवसायातील यशाचे गमक आहे.त्यामुळे शेळीपालन व्यावसायिकांचे उत्पन्नात वाढ व्हावी व शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक आधार मिळावा हा या मागचा हेतू आहे.
शेळ्यांच्या सद्यस्थितीतील परिस्थितीचा विचार केला तर जवळजवळ आपल्याकडील 70 टक्के शेळ्या 300 मिली पेक्षा कमी दूध देतात. तसेच बोकड आणि शेळी यांचे वजन पाहिले तर तीस ते पस्तीस किलोचा आत असते.
अशा शेळ्यांमध्ये अनुवंशिक गुणधर्मांमध्ये सुधारणा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद, जमनापरी आणि दमास्कहुन आयात केलेल्या रेतनाद्वारे कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे. सध्या राज्यामध्ये 4848 पशुवैद्यकीय दवाखाने असून या माध्यमातून 3000 कृत्रिम रेतन केंद्र उभारली जाणार आहे. तसेच नंतर या महामंडळाच्या माध्यमाचा महिलांसाठी शेळी सखी हा उपक्रम देखील आहे.
Published on: 19 April 2022, 12:29 IST