भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि पशुपालन हे त्याचा अविभाज्य घटक आहे. खेडोपाडी पशुधनाची विशेष महत्त्व आहे आणि ग्रामीण भागातील महिला देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण कार्यभार सांभाळतात. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता( मनुस्मृती 3-56) वरील संस्कृत सुभाषित आपणा सर्वांना ज्ञात आहे. जेथे स्त्रीची पूजा केली जाते तिचा सन्मान केला जातो तेथे साक्षात देवही वास्तव्य करतात.
अशा अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या स्त्रियांचा पशुसंवर्धनातील सहभागाविषयी घेतलेला हा एक अल्प आढावा. पावसाच्या अकाली पणाचा व अ भावाचा जवळा शेती व पिकांवर परिणाम होतो तेवढा पशुधनावर होत नाही. तसेच पशुधन हे कुटुंबाच्या उत्पन्नात अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः दुष्काळ परिस्थितीत पशुधनात सहसा लहान व मोठ्या दोन्ही जनावरांची एकत्र संगोपन व व्यवस्थापन केले जाते पशु उत्पादनात दूध उत्पादनाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच नेहमी गाय किंवा म्हैस इ सोबत शेळ्या किंवा कुक्कुटपालन असे चित्र या भटक्या जातीतील कुटुंबात दिसून येते.
बायफ या संस्थेच्या एका अभ्यासानुसार असे आढळून आले की उत्तर गुजरात व पश्चिम राजस्थान अशा उष्ण व समशीतोष्ण भागातील कुटुंबाच्या उत्पादनात पशुधनाचा 45 ते 52 टक्के सहभाग आहे. तसेच असे आढळून आले आहे की, तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात पशु व्यवस्थापन, पशूंचा आहार, आरोग्य व पैदास यामध्ये स्त्रियांचा अधिक सहभाग आहे, पण पशुंची विक्री बाजार, पशूंच्या खरेदी साठी असलेल्या विविध योजनांची निवड तसेच सर्व बाबींची नोंद करून ठेवणे यात महिला कमी सहभागी असतात..
पशु संगोपनात ऐतिहासिक महिलांच्या कार्याची नोंद
पुराणामध्ये श्रीकृष्णाच्या राज्यात पशु संगोपनात व दुग्ध पदार्थ बनविण्यात महिलांचा सहभाग अधिक होता याचे बरेच पुरावे आहेत. कित्येक वर्षापासून महिलांचा पशु उत्पादनात सहभाग आढळून येतो. विशेषतः आशियाई देशांमध्ये जेथे पशु उत्पादन हे कुटुंबाच्या उत्पादनात मोठा भाग आहे.
प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक, सामाजिक व्यवस्थेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने पशु संगोपन केले जाते. पण तरीही पशु व्यवस्थापनात आणि त्यापासून मिळणार्या इतर पदार्थांच्या उत्पादनात स्त्री हा सर्वस्वी केंद्रबिंदू आहे. असे असतानाही भारतीय ग्रामीण जीवनशैलीमध्ये कुटुंबातील मिळकतीची व्यक्ती म्हणून महिलांकडे पाहिले जात नाही. समाजामध्ये असा गैरसमज आहे की महिला पुरुष आहे एवढे काम करू शकत नाहीत. परंतु ठराविक क्षेत्र वगळता परिस्थिती अशी आहे की महिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करतात. बहुतांशी महिला शेती व पूरक काम जसे की कापणी, पाणी देणे, जनावरे धुणे, दूध काढणे, दुग्ध प्रक्रिया इत्यादी कामे करतात.
थोडक्यात कापणीपासून दुधाच्या प्रक्रिया पर्यंत सर्व कामे महिलाच करतात. जुन्या रुढी आणि परंपरेमुळे स्त्रियांना घराबाहेरील कामे जसे की बाजारात जाणे आणि खरेदी-विक्री वगैरे गोष्टींसाठी प्रतिबंध केला जातो. त्यामुळे पशुधन व्यवस्थापनात साऱ्या पासून ते दुग्ध प्रक्रियेत महिलांचा सहभाग असूनही खरेदी-विक्री ही कामे पुरुषच करत असल्यामुळे मिळणारा मोबदला पुरुषांच्या हातात जातो. अशाप्रकारे पशु व्यवस्थापन हे महिलांच्या मदतीशिवाय अ पूर्ण असूनही दुर्दैवाने त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही.म्हणून महिलांचे पशू व्यवस्थापनातील महत्व कमी लेखले जाते.
सर्वेक्षणानुसार असे पाहण्यात आले आहे की महिलांना बऱ्याच उपलब्ध चार याविषयी ज्ञान असते जसे की, दूध वाढीसाठी महत्त्वपूर्ण चारा, औषधी गुण असलेला चारा, महिला अधिक जनावरांच्या सर्व सवयी व उत्पादन क्षमता या विषयी जागरूक असतात. त्याचप्रमाणे त्याच जनावरांना चारा घालतात. कुटुंबाच्या रोजच्या आहारात आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दूध देणाऱ्या गाई आणि म्हशी यांचे पूर्ण योगदान असते. महिला अशी जनावरे निवडतांना दुधाची गुणवत्ता, वातावरण आणि उत्पादनाचा दर्जा या गोष्टींना जास्त महत्व देतात.
आधुनिक पशुपालनात महिलांचे योगदान
राष्ट्रीय विकास हा नेहमी पुरुष आणि महिला यांच्या सहभागावर अवलंबून असतो. निर्जंतुक दूध उत्पादनात मैदा ह्या अधिक प्रभावीपणे योगदान देतात. असावी म्हणजे प्रशिक्षण गावात जवळपास असावे तर वेळ शक्यतो दुपारची असावी म्हणजे महिला घराच्या कामातून वेळ काढून प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील. ग्रामीण विकास योजना अंतर्गत पशुधन विकासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांचा सहभाग हा बहुतांश तंत्रज्ञानानुसार पशुधन विकासामध्ये असणे आवश्यक आहे. अनुभवी महिला, पशु शास्त्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाली पाहिजे.
तसेच फक्त तज्ञ म्हणूनच नव्हे तर तळा गाळाला असलेल्या ग्रामीण लोकांच्या विकासासाठी योजनांतील आणि प्रतिबंध तील कामासाठी महिलांची आवर्जून नियुक्ती केली पाहिजे. आजच्या युगात पशु विकास क्षेत्रात पुरुष व महिला यांना जर समान न्याय व सन्मान द्यायचा असेल तर त्यांना सारख्या संधी व सोयी द्याव्या लागतील. असं केलं तरच आपण पशू उत्पादनातून राष्ट्राचा विकास करू शकतो.
लेखक
- डॉ. मंजूषा पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुप्रजनन विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी
- डॉ. पंकज हासे, सहाय्यक प्राध्यापक पशु औषध उपचार शास्त्र, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई
- डॉ. मीनाक्षी पाटील, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय परभणी
Published on: 07 April 2021, 08:57 IST