Animal Husbandry

केंद्र सरकारने राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. पशु संवर्धन विभागाला दिलेल्या निधीनमुळे राज्यातील पशुपालनाची स्थिती सुधरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पशु संवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न, पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोशशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे.

Updated on 19 June, 2021 6:32 PM IST

केंद्र सरकारने राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. पशु संवर्धन विभागाला दिलेल्या निधीनमुळे राज्यातील पशुपालनाची स्थिती सुधरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

पशु संवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न, पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोशशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आमि ३ टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली.

मात्र या योजनेचा १५ हजार कोटींची निधी यावर्षी (२०१२-१२) देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया(आयईस्क्रीम, चीजनिर्मीत, दूध, पाश्चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी,) मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास, प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० ट्क्के कर्ज उपब्ध करुन देण्यात येणार असून, व्याजदरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना आणि कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर http://dahd.nic.in/ahdf उपलब्ध आहे.

 

सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विविध उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चत वीर्यमात्रा, बाह्य फलन केंद्र(आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. सदर योजनेच्या व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना घेता येईल.

 

राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी उपयुक्त असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा - सचिंद्र प्रताप सिंह पशुसंवर्धन आयुक्त

English Summary: 15,000 crore provided by the Central Government for animal husbandry schemes
Published on: 19 June 2021, 06:32 IST