पुणे
पशुपालनसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. तसंच पशुपालन हे शेतीला पूरक आणि शाश्वत व्यवसाय म्हणून याकडे शेतकऱ्यांनी वळावे. यासाठी सरकारने अनेक योजना राबवत असतं. जवळपास ४५ प्रकारचे उद्योग असून यासाठी लाखाोंचे अनुदान देण्यात येतं. तर शेतकरी गटाद्ववारे पशुपालन उद्योग उभारला तर त्यासाठी ३ कोटींचे अनुदान देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आणि अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या सूचनेनुसार पशुपालक शेतकरी मेळाव्याचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या गाय गोठ्याच्या उभारणीसाठी अनुदान योजनेची माहिती आणि बँकेच्या सुविधांबद्दलची चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला पुण्यातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत ४५ प्रकारच्या वैयक्तिक उद्योग योजनांची माहिती दिली. तसंच वैयक्तिक पातळीवर उभा करता येणाऱ्या उद्योगांसाठी केंद्र शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के अनुदान दिलं जातं...
आणखी कोणत्या पालनासाठी मिळते अनुदान?
दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना लागू केली आहे. या माध्यमातून हे अनुदान दिले जाते. या योजनेत अनुदानाची कमाल मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपये आहे. हे अनुदान कुक्कुटपालन, मेंढीपालन, शेळीपालन, डुक्कर पालन आणि चारा यांच्याशी संबंधित उद्योग उभारण्यासाठी दिले जात आहे.
Published on: 08 August 2023, 12:32 IST