जिरे हे पीक प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये रब्बी हंगामात घेतले जाते. आपल्याला माहित आहेच की अन्न चवदार बनविण्यासाठी स्वयंपाकात जिऱ्याचा वापर केला जातो. याशिवाय मसाल्यांचे मिश्रणही वापरले जाते. जिरे पासून मिळणारे तेल हे साबण, केसांचे तेल आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी वापरली जाते. जिरे एक औषधी पिक सुद्धा आहे. या पिकावर झुलसा नावाचा आजार येतो. या रोगा बद्दल आपण माहिती घेऊ.
झूलसा आजाराची कारणे
हा रोग प्रामुख्याने अल्टरनेरिया बार्णेसी क्या बुरशीमुळे होतो. पिकाला फुले आल्यानंतर आकाशात ढग आल्यासारख होण्याची खात्री जास्त असते.हा रोग फुलांच्या कळी पासून पिकांच्या कापणीपर्यंत कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो. हवामान अनुकूल असताना हा रोग वेगाने पसरतो.
या रोगाची लक्षणे
या रोगाची लक्षणे प्रथम पानांवर लहान लहान तपकिरी डाग दिसतात आणि हळूहळू हे डाग जांभळे आणि शेवटी काळे होतात. यामुळे पाने, देठआणि बियाण्यावर उद्रेक होतो.
पानांचे किनार हळूहळू वाळू लागतात.जर संसर्ग नंतर ओलावा वाढला किंवा पाऊस पडला तर रोग अधिक वाढतो. रोगाची लक्षणे दिसताच उपाययोजना न केल्यास तर नुकसान थांबवणे अवघड होते.
झुलसा रोगावर प्रतिबंधात्मक उपाय
- जास्त माणात सिंचन करू नये.
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करून शेतात मोकळे सोडले पाहिजे.
- बियाणे निरोगी वापरावे.
- बियाणे पेरणीच्या वेळी थायरम बुरशीनाशक बरोबर उपचार करा. मंकोझेब 75 डब्ल्यू पी किंवा कार्बेन्डाझिम डब्ल्यू पी ची पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी प्रति लिटर पाण्यात दोन ग्रॅम फवारणी केल्यास रोगाचा प्रतिबंध होतो.
- या आजाराची लक्षणे दिसताच हेक्साकोनेझोलहे मिश्रण चार टक्के प्रति लिटर पाण्यात किंवा मेटी राम 55 टक्के+ पायराक्लोस्ट्राबीन 5 टक्के द्रावण प्रति लिटर पाण्यात पाच ग्रॅम दराने फवारणी करावी. आवश्यक असल्यास पंधरा दिवसानंतर फवारणी पूर्ण करावी.
Published on: 22 October 2021, 12:25 IST