पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी झिंक गरजेचे आहे.झिंकहेबियाणे आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीमध्येझिंकगरजेचे आहे. पिकांच्या पेशींमध्ये जर योग्य प्रमाणात झिंक असेल तर पिके कमी तापमानात देखील चांगला तग धरून राहते. तसेच डोल ऍसिटिक ऍसिड चे निर्मितीत सहकार्य करते.त्यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होते. प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एंजाइम ची निर्मिती करते.
पिकांमधील झिंक चे महत्व
1-मातीचा सामू जास्त असल्यास झिंकची कमतरता जाणवते.मात्र हा नियम सर्व ठिकाणी लागू होत नाही. यासाठी ऍसिडिक स्वरूपातील झिंक वापरले तर ही कमतरता दूर करता येते.
2- जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते.
3- नत्राची कमी प्रमाणातील उपलब्धता पिकाच्या वाढीवर करीत असलेल्या दुष्परिणामांमुळे इतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंकवर देखील लागू पडतो.
4-जमिनीतील स्फुरदचे जास्त प्रमाण झिंकचेशोषण कमी करते.
5- जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिंक चे विश्लेषण करतात.
- त्यामुळे झिंकचे कार्बोनेट, बायकार्बोनेट सोबत होणारे स्थिरीकरण कमी होते व पिकांसाठी उपलब्धता वाढते.
7- लोकांमध्ये जर नत्राची कमतरता असेल तर साहजिकच पिकांची वाढ कमी होते व त्यामुळे इतरांना द्रव्यांचे देखील कमतरता जाणवते. ज्यात झिंक चा देखील समावेश होतो.
8- मॅग्नेशियम च्या वापराने झिंकचे शोषण देखील वाढते.
9- पिकांमधील ऑक्सिनच्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे.
10- पिकांच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इन्डोल ऍसिटिक ऍसिड ची निर्मिती ही झिंक पासून होते. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड कार्य करते जे झिंक चा वापरानेतयार होते.
11-मॅग्नेशियम च्या वापराने झिंकचे शोषण देखील वाढते.मका, कापूस, फळपिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा,तुर, सोयाबीन आणि भात या पिकांना झिंक दिल्यास उत्पादनात वाढ होते.
सेंद्रिय पदार्थ आणि झिंक
- जमिनीतील सेंद्रियपदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इन ऑरगॅनिक स्वरूपातील जस्ताचे चीलेशन होऊन त्याची पिकास उपलब्धता वाढते.
- जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपलब्धता कमी होते.
- अशा प्रकारे पिकांमध्ये झिंक कार्य करत असते.
Published on: 27 November 2021, 01:10 IST