हॉस्पिटल म्हंटल की डोळ्यासमोर औषधांपेक्षाही आधी येते ते खर्च. रुग्णालयात होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत लोक कायम चिंतीत असल्याचे दिसून येते, कारण medical emergancy कधीही येऊ शकते. कोरोनाच्या काळात आपण हे पाहिलेच आहे. अशावेळी आपल्याजवळ पैसे असणे गरजेचे आहे. यासाठीच सरकारच्या एका योजनेद्वारे एका तासात एक लाख रुपये पर्यंतची रक्कम मिळू शकते.
अशी आहे योजना
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ ) या योजनेअंतर्गत
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन गरजेसाठी एका तासात एक लाख रुपये मिळण्याची सुविधा आहे.एक जून २०२१ रोजी सरकारने याबाबतचे सर्क्युलर जारी केले असून या सुविधेचा वापर करून कर्मचारी कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. या प्रक्रियेसाठी आधी तीन ते सात दिवसांचा कालावधी लागत होता परंतु कोरोनाच्या काळात यामध्ये बदल करण्यात आला व एका तासाच्या आत रक्कम जमा करण्याचा नियम बनवण्यात आला.
ही वैद्यकीय सुविधा सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी असून याचा लाभ घेण्यासाठी पेशंटला सरकारी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.
अशी मिळणार रक्कम
१) www.epfindia.gov.in संकेतस्थळावर जा..
संकेतस्थळावर वरती ऑनलाइन एडव्हांस क्लेम वर क्लिक करा.
https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर तुम्ही जाल.
२) ऑनलाइन सेवावर जा आणि त्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा लागले.
बँक खात्याचे अखेरची चार अंक पोस्ट करा .
३) खाते व्हेरिफाय करा.
proceed for online claim वर क्लिक करा
ड्रॉप डाउनमधून pf advance हा पर्याय निवडा (form 3
पैसे काढण्याचे कारण निवडा
४) हवी ती रक्कम टाका
चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा व पत्ता टाका
५) get aadhaar otp वर क्लिक करा. आधार लिंक्ड मोबाइल वर आलेला otp पोस्ट करा
६) तुमचा क्लेम फाईल झाल्यानंतर अन् त्याला दुजोरा मिळाल्यानंतर एक तासभराच्या आतमध्ये खात्यावर पैसे जमा होती
सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.
Published on: 06 March 2022, 06:20 IST