Agripedia

ज्याप्रमाणे इतर अन्नद्रव्ये पिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात त्याचप्रमाणे कोबड आणि व्हॅनाडिअमचे कारण हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आज आपण ती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Updated on 15 May, 2022 11:33 AM IST

कोबाल्ट कोबाल्ट हे अन्नद्रव्य वनस्पतीमध्ये व्हिटॅमिन B-12 मधील एक महत्त्वाचा घटक आहे. ज्यामुळे द्विदल पिकांमध्ये वातावरणातील नायट्रोजनचे अमिनो आम्ले आणि प्रथिनांमध्ये स्थिरीकरण करण्यासाठी हे मूलद्रव्य महत्त्वाची भूमिका बजावते.

द्विदल पिकांच्या मुळांवर तयार होणाऱ्या रायझोबियमच्या गाठी निर्माण करण्याच्या प्रक्रियेत तसेच रायझोबियमची वाढ होण्यासाठी कोबाल्ट उपयोगी आहे.हे वनस्पतीच्या चयापचयामध्ये संप्रेरकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी मदत करते.

याची कमतरता असलेल्या पिकांमध्ये नत्राची कमतरता असल्याची लक्षणे दिसतात व्हॅनाडिअम व्हॅनाडिअम हे मूलद्रव्य वनस्पतीमध्ये नायट्रोजनचे अन्नामधील अंतिम स्वरूपात रूपांतर होत असताना जेव्हा मॉलिब्डेनमची गरज असते त्याच्या पूर्ततेसाठी उपयोगी येते.एकदल वनस्पतीसाठी उपयुक्त जिवाणू

ऍझोटोबॅक्‍टरची वाढ ही व्हॅनाडिअममुळे चांगली होते. ज्यामुळे हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणाला मदत होते.वनस्पतीमध्ये जर मॉलिब्डेनम पुरेशा प्रमाणात असेल तर वनस्पतीला वाढीसाठी व्हॅनाडिअमची गरज भासत नाही.वनस्पतीमध्ये व्हॅनाडिअमचे प्रत्यक्ष कार्य काय आहे, याबद्दल अजून संशोधन व्हायचे आहे.

English Summary: You will be amazed to read the work of cobalt and vanadium for crops
Published on: 15 May 2022, 11:33 IST