सध्या बाजारात गाजराचा हंगाम सुरू आहे. आपल्या माहितीनुसार आजपर्यंत आपण फक्त दोन प्रकारची गाजरे पहिली आहेत पाहिलं म्हणजे देशी गाजर आणि दुसरं म्हणजे विदेशी गाजर. देशी गाजराचा आकार हा मोठा असतो सोबत चवीला उत्तम आणि गोड असे असते सोबतच विदेशी गाजर हे लांब असते परंतु देशी गाजराच्या तुलनेत हे कमी गोड असते.जर तुम्हाला कोणी सांगितली की काळे गाजर सुद्धा असते तर तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढल्याशिवाय अजिबात राहणार नाही कारण आजपर्यंत आपण फक्त लाल किंवा केशरी रंगाचे गाजर पाहिले आहे. तर हे सत्य आहे पंजाबी मधील एका कृषी विद्यापीठाने काळ्या रंगाच्या गाजराच्या वाणाची निर्मिती केली आहे. तसेच या गाजराला पंजाब ची ब्लॅक ब्यूटी असे सुद्धा म्हटले जाते आहे.
गाजर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे:
सध्या पंजाब मध्ये या गाजराची लागण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण इतर गाजराच्या तुलनेत या काळ्या गाजरात अनेक फायदेशीर आणि गुणकारी घटक आहेत. देशातील कुपोषण संपण्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठाने हे काळे गाजर तयार केले आहे.या काळ्या गाजरामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक सुद्धा आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. या वाणाच्या गाजराचे सेवन केल्यावर आपली शरीरातील रक्त शुद्ध होते असे पंजाब विद्यापीठाने सांगितले आहे. वनस्पती विभागाच्या संशोधनानुसार या गाजरा चे सेवन केल्यावर अॅनिमियाची कमतरता, बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार यापासून कायमस्वरूपी सुटका मिळते.
काळ्या गाजराचे उत्पन्न हे 1 एकर क्षेत्रात कमीत कमी 150 ते 200 क्विंटल एवढे मिळते. या वाणाची पेरणी केल्यानंतर 90 ते 95 दिवसात हे गाजर खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी तयार होते. बाजारात या गाजराचा भाव सुद्धा चांगला मिळत आहे.या जातीच्या गाजरामध्ये अनेक पोषक घटक आहेत यामध्ये अँथोसायनिन्स, फ्लेव्होनॉल्स ß-कॅरोटीन, कॅल्शियम, लोह चे प्रमाण आहे. आहारासाठी हे गाजर अत्यंत उत्कृष्ट व पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे आहे.
काळे गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे:-
1)काळ्या गाजराचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध राहते.
2)पोटसंबंधीत असलेल्या आजारांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी काळ्या गाजराचे सेवन करणे आवश्यक.
3)कुपोषणाची तक्रार दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे काळे गाजर.
4)कर्करोगावर उपाय तसेच शरीरातील कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नष्ट करते.
5)काळे गाजर खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढते तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
Published on: 16 February 2022, 02:10 IST