उत्पादन वाढीसाठी शेतकरी आता पारंपरिक पिकावर भर न देता शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्पन्न ही भेटत आहे. लिली या फुलांची शेती शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. लिली हे परदेशी फुल असले तरी कोणताही कार्यक्रम असला तरी सुद्धा सजावटीसाठी हे फुल वापरले जाते. भारतात तर या फुलाला मागणी आहेच त्यासोबत परदेशात सुद्धा या फुलाला तेवढीच मागणी आहे. शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती लिली फुलांमुळे सुधारू शकते. या फुलाचे उत्पादन पॉलिहाऊस मध्ये वर्षभर घेतले जाते मात्र अजूनही व्यवसायिक पद्धतीने याकडे कोणी पाहिले नाही. सध्या लिली फुलाची शेती आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात फुलवली जात आहे.
लिलीची फुलाची अशी करा लागवड :-
लिली फुलांची शेती तीन टप्यात केली जाते. पहिला टप्पा म्हणजे ते टिशू प्रक्रियेत नर्सरी मध्ये तयार करतात जे की मोठ्या प्रयोगशाळा मध्ये हे केले जाते. दुसऱ्या टप्यात याची नर्सरीमध्ये लागवड केली जाते जे की या वनस्पती ला फुले न मिळता कंद मिळते. तिसऱ्या टप्यात जे मिळालेले कंद आहे ते एका भांड्यामध्ये लावले जाते. डोंगराळ भागात या फुलाला पोषक वातावरण उपयुक्त असते.
मैदानी भागात अशा प्रकारे करा शेती :-
लिली ची शेती मैदानी भागात करायची असेल तर पॉलिहाऊस मध्ये केली जाते. पॉलिहाऊस मध्ये लिली ची लागवड करायची असेल तर त्यास २.५ किलो कोकोपेट, २.५ किलो गांडूळ खत, २.५ किलो स्ट्रॉ व ५ किलो कोळशाची राख लागते. या सर्व साहित्याचे मिश्रण करावे व सर्वत्र पसरावे. हे सर्व झाल्यानंतर कंद ची लागवड करावी. लागवड केलेले कंद वाढायला ३ महिने लागतात. या तीन महिन्यात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते तसेच ठिबक सिंचनाद्वारे यास पाणी देणे गरजेचे आहे. तीन महिने वाढ झाली की मुळासकट याची काढणी करावी लागते.
देशामध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध :-
लिली फुलांची शेती करून शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात. लिली च्या कंदाला बाजारात मोठी मागणी आहे तसेच जर कंद विकायचे नसेल तर तुम्ही कंद लागवड करून त्याची फुले सुद्धा विकू शकता. ज्यावेळी तुम्ही कंदाची लागवड पॉलिहाऊस मध्ये कराल त्यानंतर ७ दिवसांनी पॉलिहाऊस चे तापमान २० - २५ अंश निश्चित करावे. कंद लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी यास कळी फुटते आणि नंतर फुले लागतात. लिली ची शेती भारतामध्ये फारच कमी भागात केली जाते त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांशी आधीच व्यवहार करतात या कंपनीचा असा फायदा आहे की शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाण्याची गरज नाही.
Published on: 23 January 2022, 09:10 IST