कोल्ड स्टोरेज ची गरज :
भारत एक शेतीप्रधान देश असुन 165.7 लाख हेक्टर जमिनीवर अन्नधान्य पिकवले जात असते, त्यातुन 426.71 लाख मे.टन अन्नधान्य, डाळी, तेलबिया, कापूस, ज्युट, ऊस इ.पिकांचे उत्पादन होते. त्यासोबत आज शेतकरी भाजीपाला उत्पादन याचेही प्रमाण सुद्धा करत आहे. अन्नधान्याचे उत्पादनात मोठा प्रमाणावर वाढ होत आहे. शेतकरी नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून आता पिकांच्या उत्पादनावर भार देत असल्यास आज त्याच्याकडे भरपूर अन्नधान्य व भाजीपाला पिकले जात आहे. कोल्ड स्टोरेज याचा वापर याच अन्नधान्य व भाजीपाला यांच्या संरक्षणासाठी केला जातो.
यामध्ये तापमान कमी असल्याकारणाने त्यातील ठेवलेले पदार्थ खराब होत नाही येत व त्यामुळे त्यांचा जास्त वेळासाठी वापर करता येतो. उत्पन्नाचा बाजार भाव वाढ वाढल्यास यांची विक्री परत केली जाते अशाप्रकारे शेतकऱ्याला जास्त नुकसान होत नाही.
कोल्डस्टोरेज ला मिळालेले अनुदान :
हा कोल्ड स्टोरेज उद्योग उभारण्यासाठी आज वेगवेगळ्या अनुदान योजना राबविल्या जात आहे.तसेच प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी यासाठी वेगवेगळ्या योजना सरकार आणत आहे.
आज यासाठी शेतकऱ्यांना यासाठी तब्बल 50 टक्के अनुदानाची व्यवस्था केली गेली आहे. सरकारच्या ही योजनेचा नक्कीच शेतकऱ्याला लाभदायक ठरेल.तुम्हाला साधारणता ५ मेट्रिक टन माल व्यवस्थित ठेवण्यासाठी 50 ते 60 स्क्वेअर फुटाची जागा लागेल ज्याच्या मध्ये 24 तास लाईट उपलब्ध राहील त्याच बरोबर तीनशे ते चारशे एचपी इलेक्ट्रिसिटी असेल यासाठी साधारणतः तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो ज्यामध्ये तुम्ही 10 ते 12 माणसे ठेवू शकता यामध्ये दोन प्रकार तुम्ही एक गोष्ट विचारु शकता ती स्वतःची प्रॉडक्ट किंवा दुसऱ्याचे प्रॉडक्ट रेंट वर ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही आधुनिक व्यवसाय निवडून महिन्याला चांगली कमाई करू शकता.
कोल्डस्टोरेज मुळे होणारे फायदे :
•भाजीपाला हा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहावा, यासाठी ‘कोल्ड स्टोरेज’ची मोठी मदत मिळते.
•एखाद्या गोष्टीचे उत्पादन एकवीस जास्त निघते व खप कमी असतो अशा वेळी च्या वस्तू टिकून ठेवणे अवघड जाते त्यामुळे कोल्डस्टोरेज हा उत्तम मार्ग असतो.
• महिनाभर तरी आपला माल व्यवस्थित टिकवून राहू शकतो.
-ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)
Published on: 07 March 2022, 03:29 IST