थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी चे पीक घेतले जाते मात्र आता दुसऱ्या भागात सुद्धा पोषक वातावरण तयार करून पीक घेतले जात आहे. पीक पद्धती आणि उत्पादनात वाढ या अनुषंगाने शेतकरी प्रयत्न करत आहेत. भारतात स्ट्रॉबेरी ची शेती जास्त करून उत्तर भारतात केली जाते जे की उत्तर भारत व्यतिरिक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा शेती करावी लागत आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर च्या दरम्यान स्ट्रॉबेरी ची लागवड केली जाते मात्र थंड हवेच्या ठिकाणी फेब्रुवारी ते मार्च च्या दरम्यान स्ट्रॉबेरी ची लागवड केली जाते. पॉलिहाऊसद्वारे इतर महिन्यातही आपण या पिकाची लागवड करू शकतो. लागवड करण्याआधी मशागत करणे आवश्यक आहे. जसे की उभी, आडवी पाळी करून शेतजमीन भुसभुशीत करावी.
अशी आहे लागवड पध्दत :-
लागवड करण्यासाठी बेड ची उंची जमिनीपासून १५ सेमी वर असावी तसेच दोन्ही बेड आणि दोन्ही रोपातील अंतर ३० सेमी असावे. एका ओळीत ३० रोपे लावण्यात येणार आहेत. फुलोऱ्यात फळबाग आली की मल्चिंग करावे. मल्चिंग चा वापर केल्याने तण नियंत्रण राहते तसेच रोगराईपासून फळबागांचे सरंक्षण होते. मल्चिंग केल्यामुळे जास्त वेळ जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि उत्पादनही जास्त निघते. शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे कमी होते. डोंगराळ भागात पाऊस सुरू झाला की पॉलिथिनने स्ट्रॉबेरी ची रोपे झाकून ठेवावी असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. तुम्ही ही असा प्रकारे स्ट्रॉबेरी ची लागवड केली तर फायदेशीर ठरेल.
६०० प्रकारच्या स्ट्रॉबेरी च्या जाती :-
जगात स्ट्रॉबेरी च्या ६०० प्रकारच्या विविध जाती आहेत. भारतातील व्यापारी वर्ग या ६०० जातींमधील कामरोसा, चँडलर, ओफ्रा, ब्लॅक पिकॉक, स्वीडे चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जातींचा लागवडीसाठी वापर करतात. भारतामध्ये हवामानाचा पूर्णपणे अभ्यास करून स्ट्रॉबेरी च्या या जातींची निवड करण्यात आलेली आहे. जे की थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी ची लागवड फेब्रुवारी ते मार्च च्या दरम्यान केली जाते.
स्ट्रॉबेरीची लागवड करताना काय काळजी घ्यावी लागणार आहे :-
स्ट्रॉबेरी ची लागवड करण्याआधी तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३-४ वेळा रोटरने नांगरणी करावी आणि नंतर शेणखत टाकावे म्हणजे उत्पादन वाढेल. हे सर्व झाले की शेतात बेड तयार करावे. १-२ फूट अंतर रुंदी बेड ची असते. रोपाची लागवड करण्यासाठी मल्चिंग चा वापर करावा जे की ठराविक अंतरावर छिद्रे सुद्धा पाडावीत. रोप लागवड झाली की ठिबक सिंचनाद्वारे रोपांना पाणी द्यावे. कंपोस्ट खताचा वालर केल्याने उत्पादनही चांगल्या प्रकारे निघते मात्र यासाठी कृषी विभागाच्या सल्ला घेणे गरजेचे आहे.
Published on: 03 February 2022, 06:51 IST