Agripedia

भारतातील शेतकरी आता परंपरागत शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती पद्धती कडे वळत आहेत. यासाठी वेगळ्या प्रकारचे पिके शेतकरी घेत आहेत. एवढेच नाही तर त्या माध्यमातून चांगला नफा देखील मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता भारतातील शेतकरी लेमनग्रास आणि पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. भारत सरकार कडून देखील या पिकांसाठी सुगंध मिशन अंतर्गत लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते.

Updated on 20 December, 2021 12:03 PM IST

भारतातील शेतकरी आता परंपरागत शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती पद्धती कडे वळत आहेत. यासाठी वेगळ्या प्रकारचे पिके शेतकरी घेत आहेत. एवढेच नाही तर त्या माध्यमातून चांगला नफा देखील मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता भारतातील शेतकरी लेमनग्रास आणि पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. भारत सरकार कडून देखील या पिकांसाठी सुगंध मिशन अंतर्गत लागवडीसाठी प्रोत्साहन  दिले जाते.

 पुदिना शेती साठी सुगंध मिशन अंतर्गत दिले जाते प्रोत्साहन….

 सुगंध मोहिमेचे संबंधित पिकांची विशेष गोष्ट म्हणजे हीपीके दुष्काळग्रस्त भागातही लागवडीस योग्य असतात.याव्यतिरिक्त त्यांच्या देखभालीसाठी जास्त कष्ट करावे लागत नाही. या पिकांमध्ये पुदिना चा देखील समावेश आहे. पुदिना चा वापर हा प्रामुख्याने परफ्युम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल,केसांचे तेल, मच्छर लोशन, डोके दुखी चे औषध आणि सौंदर्यप्रसाधने यामध्ये केला जातो. याशिवाय पुदिना च्या उत्पादनाच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.पुदिना ची लागवड आता शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

या ॲपच्या मदतीने होते नवीन तंत्रज्ञानाची माहिती

 नवीन तंत्रज्ञान आणि या पिकाच्या माहितीसाठी ॲपची  गरज बऱ्याच काळापासून जाणवत होती. हे पाहता मेंथा मित्र नावाचेॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधव पुदिनाच्या प्रगत जाती आणि तंत्राची माहिती मिळवून आपला नफा लाखात वाढवू शकतात. शेतकरी बांधव हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून त्यांच्या फोनवर डाऊनलोड करू शकतात.त्यानंतर ते नाव, मोबाईल नंबर, राज्य आणि पिन कोड टाकून या ॲपमध्ये नोंदणी करूनया ॲपच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. सद्यस्थितीत हे  ॲप हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

 पुदिना लागवडीमुळे शेतकऱ्यांचे भविष्य बदलू शकते..

 देशभरात पुदिना उत्पादनात उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून तेथील बाराबंकी हाजिल्हा पेपरमिंट अर्थात  पुदिन्याच्या लागवडीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहे.पारंपारिक शेती सोडून पुदिना ला शेतकऱ्यांची पहिली पसंतीदेत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा कना बनत आहे. 90 दिवसात तयार होणाऱ्या या पिकांमध्ये शेतकरी काहीवेळातच नफा कमवू शकतात. काही तज्ञांच्या मते, हे पीक शेतकऱ्यांना 90 दिवसांच्या आत नफा देण्यास सुरुवात करते. तसेच एक एकर मध्ये 20 ते 25 हजार खर्च येतो व या गुंतवणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधव सहजपणे एक लाखापर्यंत नफा कमवू शकतात.

English Summary: you can earn more profit through peppermint farming and earning money
Published on: 20 December 2021, 12:03 IST