Agripedia

निवडुंगा हा आपल्याला सगळ्यांना माहित असलेला वनस्पतीचे प्रकार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रचना असलेल्या वनस्पती असून या वनस्पतीच्या आतल्या भागाचे पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावी अशा प्रकारची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. निवडुंग हे अतिशय उष्ण व कोरड्या वातावरणात देखील तग धरून राहते.

Updated on 28 July, 2022 12:43 PM IST

निवडुंगा हा आपल्याला  सगळ्यांना माहित असलेला वनस्पतीचे प्रकार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रचना असलेल्या वनस्पती असून या वनस्पतीच्या आतल्या भागाचे पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावी अशा प्रकारची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. निवडुंग हे अतिशय उष्ण व कोरड्या वातावरणात देखील तग धरून राहते.

आपल्याला निवडुंग  म्हटले म्हणजे नागफणी सारखे दिसणारे वनस्पती डोळ्यासमोर येते.नागफनी निवडुंगाला मराठीमध्ये फड्या निवडुंग असे म्हणतात. जर आपल्याकडे निवडुंगाच्या आरोग्यवर्धक गुणांचा विचार केला तर एक कार्यात्मक अन्न म्हणून वापरले जाते तसेच औषध व अन्न असा दुहेरी उपयोग या फड्या निवडुंगाचा केला जातो.

नक्की वाचा:Spider Plant: घरी लावा स्पायडर प्लांट; 'या'' मोठ्या समस्यांपासून मिळवा मुक्ती

 यामधील पोषक घटकांचा विचार केला तर जीवनसत्व ब, आणि लोह, कॅल्शियम, पोटॅशियम तसेच तंतुमय पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.एवढेच नाही तर यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील खूप प्रमाणात उपलब्ध असतात.

म्हणूनच त्याला काट्यांमागचा खजिना असल्याचं संबोधले जाते. जर आपण निवडुंग लागवडीच्या विचार केला तर ती त्याचा विशिष्ट वापर आणि उद्देश काय आहे यावर अवलंबून असते म्हणजे भाजीपाला,फळे किंवा चारा म्हणून लागवड केली जाते.

निवडुंगाची काटेरी जाती आणि काटे विरहित अशा दोन प्रकारच्या जाती असतात.  जर आपण लागवड कालावधीचा विचार केला तर जुलै सप्टेंबर आणि फेब्रुवारी एप्रिल महिन्यात लागवड केली तर फड्या  निवडुंगाची वाढ व दर्जेदार होते.

नक्की वाचा:Brain Health:तणाव चिंता दूर ठेवण्यासाठी तुमच्या मेंदूला द्या 'हा' 5 प्रकारचा आहार, राहाल आनंदी

फड्या निवडुंगाचे फळे हंगामी असून त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते नाशवंत असते.त्यामुळे इतर ऋतूंमध्ये ते उपलब्ध होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे.

त्याच्या आरोग्यदायी फायदे पाहता त्याच्या आता नवीन काटे विरहित निवडुंगाची उत्पादन घेण्यास बऱ्याच ठिकाणी सुरुवात झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याच्या पद्धती देखील पुढे आले आहेत.

 ही उत्पादने देतील चांगला आर्थिक नफा

या पासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जाऊ शकतात.उदाहरणच घ्यायचे झाले तर कॅन्डी,रस,सिरप,सुकविलेले फळ,लोणचे,जेली,जाम,कोशिंबीर व इतर विविध प्रकारची उत्पादने बनवून त्यातून चांगला आर्थिक उत्पादनांच्या संधी उपलब्ध आहेत. तसे तयार अन्नपदार्थ जास्त दिवस टिकवून गरजेनुसार त्यांचा आहारात समावेश करता येतो.

नक्की वाचा:Health Tips: मनुके आवडतात ना..! 'या' रंगाचे मनुके खा, तेव्हाच मिळेल फायदा, वाचा सविस्तर

English Summary: you can earn more profit and money through cactus cultivation
Published on: 28 July 2022, 12:43 IST