भारत देशात वेगवेगळ्या मिरचीची लागवड केली जाते जे की यामधून जे मसाले तयार होतात ते मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. जगभरात भारतातील मसाल्यांना मागणी आहे. मसाले निर्यातीत भारताचा पहिला नंबर लागतो. देशात जवळपास सर्वच मसाल्यांची लागवड केली जाते त्यामधील एक म्हणजे काळी मिरची. काळ्या मिरचीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकरित्या चांगला फायदा झाला आहे. गरम मसाला तयार करण्यासाठी काळ्या मिरचीचा वापर केला जातो जे की बाजारात सुद्धा या मिरचीला वाढीव दर आहेत. केरळ राज्यात सर्वात जास्त लागवड केली जाते. एकट्या केरळ मधून उत्पादनाच्या ९८ टक्के उत्पादन काढले जाते.
फळांच्या बागेमध्येही लागवड फायद्याची :-
काळ्या मिरची ची लागवड मोठ्या मोठ्या फळझाडांच्या मध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते. काळ्या मिरचीला तीव्र सूर्यप्रकाश तसेच पोषक वातावरण लागते. साधरणपने १० ते ४० अंश तापमान तसेच ६० ते ७० टक्के आद्रता असणे आवश्यक असते. असे पोषक वातावरण असेल तर काळ्या मिरचीची झपाट्याने वाढ होते. केरळ मध्ये असे वातावरण असल्यामुळे काळ्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघते. सुपीक जमिनीत काळी मिरचीसाठी योग्य ठरते तसेच शेतजमिनीचे पीएच 4.5 ते 6 च्या दरम्यान असावे त्यामुळे झाडे उंच होतात आणि उत्पादनही चांगले निघते.
या गोष्टींची घ्यावी लागते काळजी :-
काळ्या मिरचीची रोपे तयार करायची असतील तर त्यासाठी आधी जुन्या वेलींवरून मिरची छाटावी. छाटणी केलेली मिरची असेल त्यास माती व खत भरलेल्या पॉलिथिन च्या पिशवित ठेवावे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ५० - ६० दिवसांनी ते लागवडयोग्य बनते. एक हात रुंद खड्डा रोपांसाठी खोदावा तसेच रोप लावले की लगेच त्यास पाणी द्यावे. सुरुवातीला दोन वेळा सिंचनाद्वारे पाणी द्यावे. नंतर आठवड्यातून एकदा जरी पाणी दिले की होईल. पावसाळ्यात तर सिंचनाची गरज भासत नाही तसेच १५-२० दिवसातून तण काढावे म्हणजे मिरची ची जोमाने वाढ होते.
उत्पानवाढीचा चांगला मार्ग :-
काळ्या मिरचीला कर योग्य प्रकारे पोषक वातावरण तसेच मुबलक प्रमाणत सिंचनाद्वारे पाणी दिले तर मिरची जोमाने वाढते. जर मिरची ला दर्जा चांगला असेल तर बाजारात भाव सुद्धा चांगले भेटतात. सर्वसाधारण जर मिरचीची योग्य प्रकारे वाढ झाली तर एका मिरचीच्या रोपाला कमीत कमी एक ते दीड किलो मिरच्या लागतात. काळ्या मिरचिमधून उत्पादनही चांगले निघते तसेच दर ही चांगला असल्यामुळे आर्थिक कमाई ही चांगली होते.
Published on: 04 February 2022, 06:10 IST