Agripedia

शेतकरी मित्रांनो टोमॅटो हे एक महत्वाचे पिक आहे. टोमॅटो लागवड करून देशातील तसेच राज्यातील अनेक शेतकरी लाखो रुपये कमवीत आहेत. टोमॅटो हे आपल्या आहारातील एक महत्वाचा भाजीपाला आहे. टोमॅटो हे जवळपास प्रत्येक भाजीत वापरले जाते तसेच सलाद म्हणून वापरले जाते.

Updated on 21 November, 2021 8:45 PM IST

शेतकरी मित्रांनो टोमॅटो हे एक महत्वाचे पिक आहे. टोमॅटो लागवड करून देशातील तसेच राज्यातील अनेक शेतकरी लाखो रुपये कमवीत आहेत. टोमॅटो हे आपल्या आहारातील एक महत्वाचा भाजीपाला आहे. टोमॅटो हे जवळपास प्रत्येक भाजीत वापरले जाते तसेच सलाद म्हणून वापरले जाते.

त्यामुळे टोमॅटोला कायम मागणी असते. म्हणून टोमॅटो लागवड हि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहे. त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवड करण्याचा सल्ला देतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत टोमॅटो लागवडीचे एकंदरीत गणित. टोमॅटो लागवड करायला किती खर्च येतो आणि त्यातून नेमकी किती कमाई होते ह्याचे गणित आज आपण समजून घेणार आहोत.

 नेमकी टोमॅटो लागवड कधी केली जाते

शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड हि मुख्यता वर्षातून दोनदा म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. टोमॅटो लागवड हि खरीप हंगामात जुलै-ऑगस्टपासून ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत केली जाते. टोमॅटो लागवड हि रब्बी हंगामात देखील केली जाते, रब्बी हंगामात नोव्हेंबर-डिसेंबरपासून ते जून-जुलैपर्यंत केली जाते. म्हणजे रब्बी हंगामातील टोमॅटो लागवड लावण्याचा हा योग्य काळ आहे. त्यामुळे ज्यांना टोमॅटो लागवड करायची असेल त्यांनी लवकर टोमॅटो लागवड उरकवून टाकावी. टोमॅटो लागवड करण्यासाठी सर्वप्रथम बियाण्यापासून रोपे तयार केली जातात.

रोपे हि रोपवाटिकेत तयार केली जातात, शेतकरी बांधव नर्सरी मधून रोपे विकत आणू शकतात किंवा स्वतः शेतात रोपवाटिका तयार करून रोपे घरीच तयार करू शकतात. टोमॅटोची रोपे हि एका महिन्यात तयार होतात. म्हणजे रोपे हे एका महिन्यात शेतात लागवड करण्यासाठी तयार होतात. शेतकरी मित्रांनो एक एकर क्षेत्रात सुमारे 7000 टोमॅटो रोपांची आवश्यकता असते. टोमॅटो लागवड केल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यांनी काढणीसाठी तयार होतात.  टोमॅटो पिकातून जवळपास 9-10 महिने उत्पादन हे घेतले जाते म्हणजे शेतकरी 9 महिन्यापर्यंत टोमॅटोचे उत्पादन हे घेऊ शकतात.

 लागवडीसाठी किती येणार खर्च

 

शेतकरी मित्रांनो जसं की आपणांस ठाऊक आहे, टोमॅटोच्या अनेक सुधारित प्रजाती आहेत. टोमॅटो लागवड हि बांबू आणि तार लावून केली तर टोमॅटो पिकापासून चांगले उत्पादन हे घेतले जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो रोपे तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत टोमॅटो लागवडीसाठी तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये खर्च हा येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो एक हेक्टर टोमॅटोच्या पिकातून जवळपास 650-900 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. मित्रांनो उत्पादन हे जातीनुसार कमी जास्त होऊ शकते.

English Summary: you can earn 15 lakh through tommato cultivation
Published on: 21 November 2021, 08:45 IST