Agripedia

खरीप हंगामी येवो किंवा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना बऱ्याचदा आता मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. बरेच दुकानदार सांगतात की खताचा साठा शिल्लक नाही. कधीकधी जास्त भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून अशा पद्धतीने सांगितले जाते.

Updated on 10 October, 2021 11:29 AM IST

खरीप हंगामी येवो किंवा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना बऱ्याचदा आता मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. बरेच दुकानदार सांगतात की खताचा साठा शिल्लक नाही. कधीकधी जास्त भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून अशा पद्धतीने सांगितले जाते.

या लेखात आपण  तुमच्या जवळच्या खाता विक्रेत्याकडे खताचा किती साठा उपलब्ध आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटात माहिती करून शकता. याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

खत विक्रेत्याकडे असलेला उपलब्ध साठा अशा पद्धतीने बघा

 भारत सरकारच्या खत मंत्रालयाच्या वेबसाईटवर कोणत्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे याची माहिती दररोज अपडेट केली जाते. त्यासाठी

  • सगळ्यात आधी तुम्हीnic.in असे सर्च करावे.
  • त्यानंतर भारत सरकारच्या रसायन आणि खतम मंत्रालयाचे संकेतस्थळ तुमच्या समोर ओपन होते. या संकेतस्थळावर उजवीकडे Fertilizer Dashboard या पर्यायावर क्लिक करावी लागेल.
  • त्यानंतर पुढे e_urvark नावाचा एक नवीन पाना तुमच्यासमोर ओपन होते. ह्या पेज वर किती शेतकरी अनुदानित दराने खताची खरेदी करतात, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, किती खत विक्री झाली त्याची आकडेवारी दिलेली असते.
  • आता या पेजवरील उजवीकडच्या किसान कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • रिटेलर ओपनिंग स्टॉक एज ऑन टुडे म्हणजेच आज त्या दुकानात विक्रीसाठी खताचा किती साठा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं पाहू शकता.
  • इथपर्यंत आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं राज्य तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे त्या दुकानदाराचा आयडी म्हणजे रिटेलर  आयडी असेल तर तो टाकायचा आहे  किंवा नसेल तर तुम्ही एजन्सी  नेम या पर्याय समोर दुकानाचे नाव निवडू शकता.

 

  • जर तुम्हाला तेही माहिती नसेल तर तिथे ऑल हा पर्याय तसाच ठेवून शो या पर्यायावर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे याची माहिती पाहू शकता.
  • सिलेक्ट रिटेलर या पर्याय आंतर्गत तुम्ही तुमच्या भागातील दुकानाचा नाव निवडलं आणि शो या पर्यायावर क्लिक केलं की तुमचा समोर आज रोजी त्या दुकानात खताचा साठा किती आहे ते ओपन होतं.
  • याद्वारे तुम्ही तुमच्या विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या खताचा साठा व त्याचा दर काय आहे या सुद्धा पाहू शकता.

 

English Summary: you can check fertilizer stock to fertilizer seller by your mobile
Published on: 10 October 2021, 11:29 IST