Agripedia

उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते.

Updated on 06 January, 2022 12:08 PM IST

उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. यामुळे उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ मिळते. 

भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. 

 भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असावी.

भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. 

जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. 

 काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते. 

उपट्या प्रकारच्या जातीसाठी 100 किलो, मोठ्या दाण्याच्या जातींसाठी 125 किलो आणि निमपसऱ्या व पसऱ्या जातींसाठी 80 ते 85 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी लागते. 

 प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. 

 बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

असे केल्याने उन्हाळी हंगामात भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळते. थंडीचा कालावधी कमी होताच भुईमूग लागवडीला सुरवात करावी. लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. यामुळे उत्पादनात जास्तीत जास्त वाढ मिळते. 

भुईमूग लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर 

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३३२३३

English Summary: Yes summer groundnut plantation is benifitial
Published on: 06 January 2022, 12:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)