Agripedia

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे शेती.

Updated on 20 February, 2022 4:22 PM IST

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे शेती. उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे एकत्रित विपणानासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे या सर्व माध्यमातून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेतीसमूह /गट शेतीची आवश्य्कता. एक जमिनीचे सातत्याने होत असलेले विभाजन/ तुकडे - लोकसंख्यावाढीमुळे शेतीचे कायम आहे. धारण क्षमताही कमी होत चालली आहे. एवढ्या छोट्या क्षेत्रावर शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. असे अभ्यासात आढळले आहे या समस्येवर समूह शेती प्रभावी उपाय ठरू शकतो गटशेती यशस्वी करायची असेल तर शेतकऱ्यांना आदर्श गटशेतीसाठी प्रबोधनाची गरज आहे.

उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर करणे शेतीमधल्या उत्पादनाची अनिशित तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ग्रमीण मागात शहराकडे होत असलेले स्थलांतर यामुळे शेती क्षेत्रामुळे कुशल तसेच अकुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे त्याकरता यांत्रिकीकरण व तांत्रिक मार्गदर्शनाची आवशयकता आहे है सामूहिकरिया करणे सोयीचे होईल. जमिनीची शेतकऱ्यांकडे असलेली वैयक्तिक धारणा कमी झाल्याने त्याला त्याच्या क्षेत्रात शेतावर उच तंत्रज्ञान तसेच यांत्रिकीकरणाचा अवलंब वैयक्तिकरित्या करणे आर्थिकदृषया परवडत नाही.

विपणन पद्धतीचा अवलंब : व्यक्तिगत स्तरावर शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असल्याने त्याला त्याच्या उत्पादित केलेल्या मालाचे वितरण योग्यरित्या करता येत नाही परिणामी त्याला कमी भावात त्याचा माल विकावा लागतो. त्यामुळे त्याच्या मालाला वाजवी भाव मिळत नाही. मात्र सामुहिक शेतीपदतीने उत्पादित केलेल्या मालाचे एकत्रितरीत्या विपणन केल्याने वाहतुकीवरील, काढणीपश्चापत होणारे नुकसान टाळून उत्पादन खर्चातील बचत वाढवून दूरवरची बाजारपेठ काबीज करता येणे शक्य होणार आहे.

काढणीपश्चानत प्रक्रिया करणे :

बऱ्याचवेळा निसर्गाकडून मिळालेली साथ शेतकऱयांचे अथक प्रयत्न कृषी क्षेत्रावर नियोजन करून शेतक्याचे उत्पादन अपेक्षापेक्षा जास्त आल्यास बाजारभावात घसरण होऊन शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो नाश्वत उत्पादन भाजीपाला फळे,यांचा अधिक साठा झाल्यास नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते अशावेळी काढणीपश्चात प्रकियेचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो.तसेच प्रकिया उद्योगामुळे पाश्चात्य देशातील प्रयोग सिद्ध तंत्रज्ञान आपल्या राज्यातील गटांमध्ये वापरता येईल व एकत्रित शेती विकसित करता येईल.

प्रकिया उद्योग व मुल्यवर्धन :

मोठ्या भांडवल व उत्पादन अभावी छोट्या शेतकऱयांना उत्पादित मालावर प्रकिया करणे त्याचे मुल्यवर्धन करणे शक्य होत नाही मात्र सामुदायिक शेतीद्वारे प्राथमिक प्रकिया तसेच मालाचे मुल्यवर्धन शेतावरच करता येणार आहे गुंतवणूक दरांनी शेतकरी गटाकडून एकाच ठिकाणी कच्चामाल मिळून प्रकिया उद्योगास चालना मिळेल

 

शेतीपूरक जोडधंदा :

सामूहिक शेतीमधील लागवड योग्य जमिनीवर विविध पिकांचे उत्पादन घेण्याबरोबरच उपयुक्त जोडधंदा म्हणून पशुपालन, मधुमक्षिका पालन रोपवाटिका तयार करणे इत्यादी बाबी आवश्यक आहे.

 

शेतकरी गटाकडील उपलब्ध साधनसामग्री सुविधा यासह पुढील बाबी अंतर्भूत असाव्यात

१)जमीन सुधारणा समतलीकरण व सामूहिक सिंचन व्यवस्था निर्मिती समूहामध्ये असणाऱ्या क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या. सिंचनाच्या सुविधांची (उदाहरणार्थ. शेततळे विहीर, बोअरवेल, सूक्ष्मसिंचन, पंप, सोलार पंप) माहिती नमू करावी.

२)यात्रिकीकरण तंत्रज्ञानाबाबत शेतकरी समूह गटाकडे उपलब्ध असलेली यंत्रसामग्री व तंत्रज्ञान नमूद करून सामूहिक अवजारे बँक निर्माण करण्यासाठी समूहातील प्रचलित, प्रास्ताविक पीक पद्धतीनुसार ती यंत्रसामग्री खरेदी करणे.

३)सामुदायिक संकलन, प्रतवारी, साठवणूक, प्रक्रिया केंद्राची निर्मिती

४)विपणानाबाबत: शेतकरी ग्राहक शृंखला विकसित करणे

५)सामूहिक पशुधन व्यवस्थापन प्रत्येक सदस्याकडून उपलब्ध पशुधन व त्यास अजून वाढ करावयाचे पशुधन याचा विचार करून पशुधनासाठी सामूहिक गोठा बांधणे, जनावरांचे मुकतसंचारसाठी जागा ठेवणे, गांडूळशेड, कंपोस्ट निर्मितीसाठी युनिट तयार करणे इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात

गटशेती स्थापना

१)समूह/ गट शेतीमध्ये सहभागी होण्यासाठी सभासद स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे.

२)शेतकरी गटांमधील सदस्य हे शक्य तो एकाच आर्थिक स्तरावरील एकाच गावातील एकाच भागातील असावेत.

३)लाभार्थ्यांमध्ये गावाच्या एका भागातील सर्व साधारणपणे २० शेतकऱ्यांचा गट स्थापन करता येईल.

 

कामकाजाचे स्वरूप

१)सभासदांनी कामकाज, आर्थिक व्यवहार इत्यादी रीतसर नोंद ठेवणे आवश्यक आहे.

२)शेतकरी गट स्थापन करताना यात शेतकरी गट शाश्वत होण्याकरिता दर महिन्यात सर्व सदस्यांनी एकत्र येण्यासाठी कोणते तरी वस्तुनिष्ठ प्रयोजन असावे. या हेतूने शेतकरी गटांमध्ये प्रत्येक महिन्याला बचत करणे आवश्यक आहे. या बचतीतून शेतकरी गटास भविष्यात बँकेकडून विनातारण पतपुरवठा होण्यासाठी विश्वासार्हता निर्माण होईल.

३)समूह/ गटाच्या शेतीच्या सभासदांनी शाश्वत गट म्हणून कार्यरत राहण्यासाठी निर्यामित बैठका घ्याव्यात.

४)गटाची स्थापना करणे,त्याच्या नियमित बैठका आयोजित करणे त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी ठराविक मासिक वर्गणी जमा करणे, कामकाजाची, व्यवहाराची नोंद ठेवणे इत्यादी क्षेत्रीय कर्मचार्यांककडून प्रशिक्षण देण्यात येईल.स्थापन केलेले गट बँकेशी जोडल्यास जोडण्यात येतील. नाबार्डसारख्या बँकेमार्फत समूह शेतीसाठी अनेक योजनांद्वारे कर्जपुरवठा, अल्प व्याजदराने विनातारण ठेवीच्या ३/४ पट कर्ज उपलब्ध होऊ शकते.

५)स्थापन होणाऱ्या समूह /गट शेतीचा गटअंतर्गत समन्वय साधण्यासाठी तालुका जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील.

 

गटशेतीचे फायदे

१)समूह शेतीमुळे उच तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुखकर होण्यास मदत होणार आहे.

२)सामूहिकरित्या शेतीमालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढणार आहे.

३)काही कृषीमालावर काढणीपश्चाीत प्रक्रिया करणे शक्यर होणार असल्याने शेतीमालास योग्य 'भाव मिळणे शक्यम होऊ शकेल.

४)शेतीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल व उत्पादन होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्यम होणार आहे.

५)समूह शेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय रोपवाटिका मधुमक्षिकापालन आदी शेतीपूरक जोडघंदे करणे शक्य होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.

 

लेखक 

:प्रवीण सरवदे (कराड)

English Summary: Yes gat sheti is today's need
Published on: 20 February 2022, 04:22 IST